PCMC City Secretary Appointment: पीसीएमसीच्या नगर सचिवपदी उल्हास जगताप यांची नियुक्ती होण्याची शक्यता

नगर सचिव पदासाठी एकमेव अर्ज वैध; 15 मेच्या सर्वसाधारण सभेत निर्णय अपेक्षित
Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri Chinchwad Municipal CorporationPudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने नगर सचिव पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सेवानिवृत्त अधिकारी त्या पदावर एका वर्षासाठी मानधन तत्त्वावर निवृत्त अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांची नियुक्ती करण्याचा विषय 15 मे रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेवर आहे.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
PCMC DMS Project: 112 कोटींची पीसीएमसीची ‘पेपरलेस’ प्रणालीच ठप्प; डीएमएसमुळे कामकाजाचा खोळंबा

महापालिकेच्या सभा शाखेचे कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यासाठी नगर सचिवपद कंत्राटी पद्धतीने भरण्यात येत आहे. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी त्या पदासाठी वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध केली होती. जाहिरातीला प्रतिसाद देऊन 30 एप्रिलपर्यंत मुदतीमध्ये केवळ उल्हास जगताप यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला आहे. मुदतीनंतर प्राप्त झालेला अर्ज बाद करण्यात आला.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri Chinchwad Nominated Corporators: पिंपरी-चिंचवडमध्ये स्वीकृत नगरसेवक निवडीचा वाद; भाजपकडून विषय पुन्हा तहकूब

एका उमेदवाराचा अर्ज प्राप्त झाला आहे. त्यामुळे निवड प्रक्रिया पूर्ण केली जाणार की, पुन्हा नव्याने अर्ज मागविण्यात येणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. मुदतीमध्ये केवळ एका उमेदवाराचा अर्ज वैध ठरला आहे. उल्हास जगताप यांची कंत्राटी नगर सचिव म्हणून एक वर्षासाठी नियुक्त करण्याचा ठराव विधी समितीने मंजूर करून सर्वसाधारण सभेकडे शिफारस केली आहे. येत्या शुक्रवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत उल्हास जगताप यांची नगर सचिवपदी नियुक्ती होण्याची दाट शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news