

पारगाव: वळती (ता. आंबेगाव) गावात स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू झालेली शिळ्या बाजाराची परंपरा, आजही भरवला जातो. हा शिळा बाजार वळती गावाची खास ओळख ठरत आहे. परंपरा, श्रद्धा आणि सामाजिक सलोखा जपत भरवला जाणारा या बाजारात यंदा लाखोंची उलाढाल झाली.
पौष पौर्णिमेला नागापूर येथील थापलिंग गडावर दोन दिवस खंडोबा देवाची यात्रा भरते. त्यानंतर तिसऱ्याच दिवशी वळती गावात हा शिळा बाजार भरतो. पूर्वीच्या काळी वळती आणि नागापूर या दोन गावांची वळती ग््राामपंचायत एकच होती. त्यामुळे थापलिंग देवस्थान हे वळतीच्या हद्दीत येत होते. त्यावेळी वळतीपासून थापलिंग देवस्थान हे तीन चार किलोमीटर अंतरावर होते.
वळती गावातील काटवानवस्ती, गांजवेवाडी या परिसरातून थापलिंग देवस्थान दूरच्या अंतरावर होते. त्यामुळे थापलिंग गडावर जाण्यापासून अनेक जण वंचित राहत होते. यात्रेकरूंची ही गैरसोय टाळण्यासाठी थापलिंग गडावरची जिलेबी-भजी, शेव-रेवडीची हॉटेल्स, खेळणी, बांगड्यांची दुकाने ही वळती गावात तिसऱ्या दिवशी येऊ लागली. त्यामुळे हा शिळा बाजार सुरू झाला. तेव्हापासून आजपर्यंत हा बाजार मोठ्या उत्साहात भरतो. या बाजारात आहिल्यानगर, बीड जिल्ह्यातील व्यावसायिक दरवर्षी आवर्जून येतात.
या बाजारात महिलांची, लहान मुलांची मोठी गर्दी पाहायला मिळते. यंदा पै पाहुण्यांना ग््राामस्थांनी जिलेबी-भजी, शेव-रेवडी आग््राहाने खाऊ घातली. महिलांनी संसारोपयोगी साहित्य, वस्तू खरेदी केल्या. या शिळ्या बाजारात यंदा लाखो रुपयांची उलाढाल झाली.
थापलिंग यात्रेचा उत्साह
थापलिंग यात्रेचा उत्साह वळती गावात पूर्वीपासून अधिकच दिसून येतो. आजही आपली गडावर ओळखीच्या काठी पालख्यांना मोठा मान दिला जातो. सर्व मुंबई, पुणेकर मंडळी आवर्जून या यात्रेसाठी हजेरी लावतात.