Online Nylon Manja Sale: संक्रांतीत जीवघेणा नायलॉन मांजा; ऑनलाइन विक्रीमुळे धोका वाढला

बंदी असूनही चिनी नायलॉन मांजा ऑनलाईन सहज उपलब्ध, पक्षी व नागरिकांच्या जीवावर बेतणारी पतंगबाजी
Nylon Manja sale
Nylon Manja Pudhari
Published on
Updated on

पिंपरी: जानेवारी महिना सुरू होताच मुलांना संक्रांतीसाठी पतंग उडविण्याचा ध्यास लागतो. दरवर्षी चिनी नायलॉन मांजामुळे पक्ष्यांना व माणसांना दुखापत झालेली आपण पाहतो. यासाठी शासनाने नायलॉन मांजावर बंदी घातली आहे. असे असतानादेखील नायलॉन मांजा मिळतो तरी कसा, हा प्रश्न पडतो. याला कारण मांजाची ऑनलाईन विक्री आहे.

Nylon Manja sale
Winter Demand Tea Eggs Jowar Bajra: पिंपरीत थंडीमुळे चहा, अंडी, ज्वारी-बाजरीची मागणी वाढली

संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजासाठी शहरातील दुकानांचीदेखील तपासणी केली जाते. दुकानदार कारवाईच्या भीतीने नायलॉन मांजा विक्रीस ठेवत नाहीत. मात्र, या घातक मांजाची ऑनलाईन विक्री सर्रास सुरूच आहे. अशा धोकादायक मांजाच्या ऑनलाईन विक्रीकडे दुर्लक्ष केले जात आहे. नायलॉन मांजामुळे पक्ष्यांना व नागरिकांना अनेकदा गंभीर इजा होतात. वेळेवर उपचाराअभावी त्यांचा अतिशय वेदनादायी पद्धतीने मृत्युदेखील होतो. हा घातक मांजा लोकांनी वापरू नये, यासाठी जनजागृती करण्यासोबतच बंदी घालण्यात आली आहे.

Nylon Manja sale
Ravi Landge Unopposed Election: भोसरी प्रभाग ६ मधून भाजपाचे रवी लांडगे बिनविरोध निवडून

तरीदेखील ऑनलाइन छुप्या पद्धतीने चिनी किंवा नायलॉन मांजाची विक्री केली जात असल्यामुळे पतंगबाजीची हौस पक्ष्यांच्या तसेच माणसांच्या जीवावर बेतत आहे. पिंपरी-चिंचवड शहरात संक्रातीदरम्यान जवळपास 100 ते 150 पक्षी मांजामध्ये अडकून जखमी किंवा मृत्युमुखी पडतात, अशी माहिती प्राणीमित्रांनी दिली आहे.

Nylon Manja sale
Kalevadi Firecracker Shop Fire: काळेवाडी तापकीर चौकात दोन फटाक्यांच्या दुकानांना भीषण आग

एकीकडे नायलॉन मांजामुळे पक्षी गंभीर जखमी होत असताना दुसरीकडे अनेक नागरिकदेखील गंभीर जखमी होत आहेत. शहरात दर वर्षी शेकडो पक्षी गंभीर जखमी होत आहेत आणि शेकडो मृत्युमुखी पडत आहेत. झाडांमध्ये किंवा मोबाइल टॉवर, इमारतींच्या गच्चीवर मांजा अडकून राहतो. त्यात अडकून पक्षी जखमी होतात. पक्षीमित्रांकडून नायलॉन मांजावर बंदी आणण्याची मागणी केली जात आहे. सरकारने कागदोपत्री मांजावर बंदीही आणली आहे. प्रत्यक्षात मात्र, आजही शहराच्या विविध भागांत पतंग दुकानांमध्ये सर्रास नायलॉन मांजाची विक्री होताना दिसत आहे.

Nylon Manja sale
Pimpri Chinchwad Pune Metro Line 3: पिंपरी चिंचवड पुणे मेट्रोलाईन-3 निर्णायक टप्प्यात; सुरक्षा तपासणी यशस्वी

ऑनलाईन मांजा विक्री

चिनी नायलॉन मांजावर बंदी असल्याने पोलिसांकडून दुकांनावर कारवाई केली जाते. मात्र, फशिंग लाईन, नायलॉन थेड, स्ट्राँग वायर अशा नावांनी हा मांजा ऑनलाईनद्वारे सहज उपलब्ध होत आहे. बनावट मइको- फेंडलीफ किंवा मकॉटन थेडफ अशा लेबलने ग््रााहकांची दिशाभूल केली जाते.

ऑनलाईन आणि दुकानांत मांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे. दरवर्षी फक्त पशूपक्षीच नाही तर मनुष्यालादेखील हानी पोहचते. अशा प्रकारच्या घटना झाल्यावर संबंधित प्रशासनाकडून कारवाई केली जाते. प्रशासनाने सणाच्या पार्श्वभूमीवरच या गोष्टींना आळा घातला पाहिजे. जेणेकरून अशा घटना घडणार नाहीत.

उमेश वाघेला (पक्षीमित्र)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news