

पिंपरी: भोसरीतील धावडेवस्ती, गुळवेवस्ती प्रभाग क्रमांक सहामध्ये भाजपाचे उमेदवार रवी लांडगे हे पुन्हा बिनविरोध निवडून आले आहेत. मात्र, त्याबाबतची अधिकृत घोषणा महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून 15 जानेवारीला करण्यात येणार आहे. निवडणुकीपूर्वीच त्यांच्या रुपाने भाजपाचे खाते उघडले आहे.
माजी नगरसेवक रवी लांडगेंच्या विरोधातील मनसेचे उमेदवार नीलेश सूर्यवंशी यांचे जात प्रमाणपत्र नसल्याने अर्ज बाद करण्यात आला. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग््रेासने संतोष काळूराम लांडगे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, त्यांचा अर्ज आला नाही. तर, अपक्ष श्रद्धा रवी लांडगे व आम आदमी पार्टी पुरस्कृत अपक्ष उमेदवार प्रसाद तुकाराम ताटे यांनी आपला उमेदवारी अर्ज गुरुवार (दि.1) मागे घेतला.
त्यामुळे प्रभाग क्रमांक 6-ब या ओबीसी जागेवर रवी लांडगे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज शिल्लक राहिला. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली; मात्र, त्याबाबतची घोषणा 15 जानेवारीला करण्यात येणार आहे.
फेबुवारी 2017 च्या निवडणुकीतही बिनविरोध निवडून आले होते. मात्र, रवी लांडगे यांच्या पॅनेलमधील उर्वरित तीन उमेदवारांना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग््रेासच्या उमेदवारांशी सामना करावा लागणार आहे.
प्रभाग क्रमांक 6-ब या जागेवर गुरुवार (दि. 1) दोन अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे भाजपाचे उमेदवार रवी लांडगे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज शिल्लक राहिला आहे. त्यांच्या विजयाची घोषणा 15 जानेवारीला करण्यात येणार आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी हिम्मतराव खराडे यांनी सांगितले.