

पिंपरी: राष्ट्रवादी काँग््रेास (अजित पवार) पक्षाच्या एका अधिकृत उमेदवाराचा एबी फॉर्म निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक हरवला. त्यावरून मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेच्या निवडणूक विभागास फैलावर घेत झापले. त्या गंभीर चुकीची दखल घेत आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी चिंचवड येथील ब क्षेत्रीय कार्यालयाचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची तडकाफडकी हकालपट्टी केली आहे. त्यांच्या जागी नवीन अधिकारी नियुक्त केला आहे.
राष्ट्रवादी काँग््रेास (अजित पवार) पक्षाच्या जयश्री मोरेश्वर भोंडवे यांनी रावेत, किवळे, मामुर्डी प्रभाग क्रमांक 16 मधून ओबीसी महिला राखीव जागेवर उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अर्जासोबत त्यांनी पक्षाचा अधिकृत एबी फॉर्मही जोडला होता. मात्र छाननी प्रक्रियेदरम्यान एबी फॉर्म गहाळ झाल्याचे कारण पुढे करत निवडणूक निर्णय अधिकारी हनुमंत पाटील यांनी जयश्री भोंडवे यांना अपक्ष उमेदवार ठरवले. या निर्णयाविरोधात भोंडवे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयात त्यांनी अर्ज दाखल करताना एबी फॉर्म सादर केल्याचे सीसीटीव्ही फुटेज, व्हिडिओग््रााफी तसेच, अन्य तांत्रिक पुरावे सादर केले. प्राथमिकदृष्ट्या या पुराव्यांमध्ये तथ्य आढळल्याने न्यायालयाने निवडणूक आयोगाला स्वतंत्र सुनावणी घेऊन सर्व बाबींची तपासणी करण्याचे आदेश दिले.
न्यायालयाच्या आदेशानुसार चिन्ह वाटपाच्या दिवशीच तातडीची सुनावणी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घेतली. सुनावणीदरम्यान जयश्री भोंडवे यांनी एबी फॉर्म वेळेत सादर केला होता, हे स्पष्ट झाले. सादर करण्यात आलेले पुरावे आणि तांत्रिक नोंदी तपासल्यानंतर हा एबी फॉर्म ग््रााह्य धरला. त्यामुळे अर्ज छाननीच्या अंतिम यादीत अपक्ष ठरलेल्या जयश्री भोंडवे यांना प्रत्यक्ष चिन्ह वाटपाच्या यादीत राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह देण्यात आले.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रशासनाने कारवाईचे पाऊल उचलले आहे. ब क्षेत्रीय कार्यालयाचे निवडणूक निर्णय अधिकारी हनुमंत पाटील यांची तडकाफडकी हकालपट्टी केली आहे. त्यांच्याकडून निवडणुकीचे कामकाज काढून घेतले आहे. त्यांच्या जागी आयुक्त हर्डीकर यांनी पुण्यातील भूसंपादन विभागाच्या उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे यांची नियुक्ती केली आहे. दरम्यान, हनुमंत पाटील यांनी एबी फॉर्म गहाळ केला, हरवला की लपवून ठेवला, याबाबत शहरात जोरदार चर्चा रंगली आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार सुनावणी घेऊन चिन्ह वाटप
न्यायालयाच्या आदेशानुसार चिन्ह वाटपाच्या दिवशीच तातडीची सुनावणी घेतली. सुनावणीदरम्यान जयश्री भोंडवे यांनी एबी फॉर्म वेळेत सादर केल्याचे स्पष्ट झाले. सादर करण्यात आलेले पुरावे व तांत्रिक नोंदी तपासल्यानंतर एबी फॉर्म ग््रााह्य धरण्यात आला. अर्ज छाननीच्या अंतिम यादीत अपक्ष ठरलेल्या जयश्री भोंडवे यांना प्रत्यक्ष चिन्ह वाटपाच्या यादीत राष्ट्रवादी काँग््रेासचे घड्याळ चिन्ह देण्यात आल्याचे अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आले. संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे कामकाज काढून घेण्यात आले आहे, असे महापालिकेचे आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.