Moshi Garbage Bepot Accident: मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील बचावकार्य समाप्त; ८४ तासांच्या मोहिमेनंतर ९ कामगारांचे मृतदेह बाहेर

वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या इमारतीवर कोसळलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून अखेरचा मृतदेह सापडला; एनडीआरएफ, सैन्य आणि प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नांना यश
Moshi Accident
Moshi AccidentPudhari
Published on
Updated on

पिंपरी: मोशी कचरा डेपो येथे वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा डोंगर कोसळला होता. बुधवारी (दि. ८) झालेल्या दुर्घटनेतील शेवटचा मृतदेह शनिवारी रात्री एकच्या सुमारास बाहेर काढण्यात आला. त्यानंतर तब्बल ८४ तास सुरू असलेले बचावकार्य अखेर समाप्त करण्यात आले. या दुर्घटनेत एकूण नऊ कामगारांचा मृत्यू झाला असून, नऊ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.

Moshi Accident
Pimpri Chinchwad Accidental Deaths: पिंपरी-चिंचवडमध्ये सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न; वर्षभरात २ हजार ४०८ अकस्मात मृत्यूंची नोंद

दुर्घटनेनंतर एनडीआरएफ, भारतीय सैन्य, महापालिकेचे अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि पोलिसांनी युद्धपातळीवर बचाव मोहीम राबवली. सुरुवातीच्या काही तासांत नऊ कामगारांना जिवंत बाहेर काढण्यात यश आले. मात्र, इमारतीवर कोसळलेल्या हजारो टन कचऱ्यामुळे आणि ढिगाऱ्याखाली दबलेल्या काँक्रीटच्या स्लॅबमुळे उर्वरित कामगारांपर्यंत पोहोचणे शक्य झाले नाही. सलग ८४ तास जेसीबी, पोकलेन, क्रेन आणि अन्य यंत्रसामग्रीच्या सहाय्याने कचरा हटविण्यात आला.

Moshi Accident
Moshi Garbage Depot Accident: चार दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आक्रोशाचा बांध फुटला; आठ कुटुंबांवर दुःखाचा डोंगर

प्रत्येक थर हटविताना आणखी कचरा घसरण्याचा धोका असल्याने बचावकार्य अत्यंत सावधगिरीने करावे लागले. शनिवारी (दि. ११) दिवसभरात सात मृतदेह बाहेर काढल्यानंतर शेवटचे बेपत्ता असलेल्या वामन कसबे (५०, रा. मोशी) यांचाही मृतदेह रात्री सापडल्याने बचावकार्याची सांगता करण्यात आली. या दुर्घटनेत भावेश वाणी, अक्षय सावंत, सुनील कोरके, सन्नी माने, महेश कुंभार, नागेश गायकवाड, रणजीत पाटील, राहुल गायकवाड आणि वामन कसबे यांचा मृत्यू झाला आहे. तर, सोमनाथ शेळके, सचिन दवडगाव, दादासाहेब आरडे, सुजाता शिंदे, रामप्रताप चव्हाण, रणवीर सिंह, विजय सपकाळ, भूषण पाटील आणि महेश राऊत यांची सुखरूप सुटका करण्यात आली.

Moshi Accident
Moshi Garbage Depot Rescue Operation: मोशी दुर्घटनेत बचाव पथकांची चार दिवसांची अथक मोहीम; एनडीआरएफसह विविध यंत्रणांचा जीव धोक्यात घालून शोधकार्य

घटनास्थळी कुटुंबीयांची गर्दी

दुर्घटनेनंतर मृतांच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. सलग सुरू असलेल्या बचाव मोहिमेकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले होते. अखेर सर्व मृतदेह बाहेर काढल्यानंतर प्रशासनाने बचावकार्य थांबविले असून, आता दुर्घटनेच्या कारणांचा सखोल तपास आणि जबाबदारी निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Moshi Accident
Moshi Accident Relatives Protest: ‘आमची माणसं जिवंत आहेत का?’; मोशी कचरा डेपोबाहेर चार दिवसांनी नातेवाईकांचा संयम सुटला

एनडीआरएफच्या ९० जवानांचे शर्थीचे प्रयत्न

बचावकार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) दोन पथकांतील सुमारे ९० जवान घटनास्थळी दाखल झाले होते. जवानांनी महापालिकेचे अग्निशमन दल, भारतीय सैन्य, पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकांसह सलग ८४ तास युद्धपातळीवर बचावकार्य राबविले. हजारो टन कचरा आणि कोसळलेल्या इमारतीच्या मलब्यात अडकलेल्या कामगारांचा शोध घेण्यासाठी अत्याधुनिक शोध उपकरणे, कटर, हायड्रॉलिक रेस्क्यू साधने आणि जड यंत्रसामग्रीच्या मदतीने अत्यंत सावधगिरीने मोहीम राबविण्यात आली.

मोशी कचरा डेपो येथे घडलेली घटना दुर्दैवी असून, यामध्ये ९ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मनाला प्रचंड वेदना देणारी ही घटना आहे. यंत्रणांनी तब्बल ८४ तास सलग बचाव मोहीम राबविली. ९ नागरिकांना सुखरुप बाहेरदेखील काढले. मात्र, ९ नागरिकांचा झालेला अंत मन हेलावून टाकणारा आहे. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत असून, त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.

डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news