Maval Panchayat Samiti Election: मावळ पंचायत समितीवर कोणाचा झेंडा? भाजप की राष्ट्रवादी—उत्सुकता शिगेला

20 वर्षांची भाजपची सत्ता कायम राहणार की राष्ट्रवादीचा नवा इतिहास; निकालाकडे मावळवासीयांचे लक्ष
BJP NCP alliance South Raigad
BJP NCPPudhari
Published on
Updated on

वडगाव मावळ : सलग 20 वर्षे भाजपच्या ताब्यात असलेल्या मावळ पंचायत समितीवर पुन्हा झेंडा फडकवण्यासाठी मावळ भाजपने कंबर कसली होती, तर विधानसभेतील सलग दोन वेळा झालेल्या विजयानंतर मावळ पंचायत समितीवर झेंडा लावण्यासाठी राष्ट्रवादीने ताकद लावली होती. त्यामुळे आता मावळ पंचायत समितीवर कोणाचा झेंडा फडकणार याची उत्सुकता मावळवासीयांना लागली आहे.

BJP NCP alliance South Raigad
Micro Drama Series: एक-दोन मिनिटांत गोष्ट सांगणारी ‘मायक्रो ड्रामा सीरिज’ तरुणाईची नवी क्रेझ

मावळ पंचायत समितीमध्ये सन 1992 मध्ये काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टी या दोन पक्षांमध्ये समसमान बलाबल झाल्याने चिठ्ठीद्वारे सभापती व उपसभापती निवडणूक घेण्यात आली होती. त्यावेळी सभापतिपदी भाजपचे एकनाथ तिळे व उपसभापतिपदी भाजपच्या रुपलेखा ढोरे यांची चिठ्ठी निघाली आणि मावळ पंचायत समितीवर भाजपची सत्ता आली होती. त्यानंतरच्या पाच वर्षात म्हणजे सन 1997 ते 2002 या काळात काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता होती.

BJP NCP alliance South Raigad
PMC BJP Majority: तुफानी बहुमत मिळालं; आता जबाबदारीने वागा

दरम्यान, सन 2002 मध्ये मावळ पंचायत समितीवर पुन्हा भाजपची सत्ता आली ती सलग 20 वर्षे म्हणजे सन 2022 पर्यंत कायम राहिली. त्यानंतर आजतागायत गेली चार वर्षे पंचायत समितीमध्ये प्रशासकीय कारभार सुरू आहे. एकंदर सन 2002 पासून आतापर्यंत जवळपास 24 वर्षे पंचायत समितीवर भारतीय जनता पक्षाचेच वर्चस्व असल्याचे दिसते.

मावळ तालुक्यात स्व. रूपलेखा ढोरे यांच्या माध्यमातून सत्तेचा श्रीगणेशा केलेल्या भाजपने त्यानंतर स्व. दिगंबर भेगडे, संजय (बाळा) भेगडे यांच्या माध्यमातून तब्बल 25 वर्षे सलग आमदारकी कायम ठेवत सत्तेचा रौप्यमहोत्सव गाठला. त्याच पद्धतीने मध्यंतरीची पाच वर्षे वगळता तब्बल 25 वर्षे मावळ पंचायत समितीवर सत्ता कायम ठेवली.

BJP NCP alliance South Raigad
Pawar family meeting: बारामतीत पवार कुटुंबीयांच्या बैठकांचे सत्र सुरूच

सन 2019 मध्ये आमदार सुनील शेळके यांच्या रूपाने राष्ट्रवादी सत्तेवर आल्यानंतर मावळ पंचायत समितीही ताब्यात घेण्याचे स्वप्न राष्ट्रवादीने पाहिले होते. परंतु निवडणुका लांबत गेल्याने हे स्वप्न पूर्ण व्हायला 7 वर्षे लागली. यादृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसने तुल्यबळ उमेदवार देऊन कोणत्याही परिस्थितीत पंचायत समितीवर झेंडा फडकवण्याचा निर्धार केला आहे, तर भाजपनेही डावाला प्रतिडाव करत राष्ट्रवादीच्याच तालमीत तयार झालेल्या पाठ्यांना उमेदवारी देऊन आव्हान उभे केले व सत्ता कायम राखण्याचा प्रयत्न केला आहे.

आज झालेल्या मतदान प्रक्रियेनंतर सर्वच उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून पर्चेस व्होटिंग हा एकमेव फंडा वापरून झालेल्या या निवडणुकीत मावळ पंचायत समितीवर भाजपचा की राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार तसेच जिल्हापरिषदेच्या पाच पैकी भाजपला किती व राष्ट्रवादीला किती जागा मिळणार हे उद्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

BJP NCP alliance South Raigad
Faraskhana Police Investigation: सोनेरी गुन्ह्यांचा तपास फक्त ‘त्या’ फौजदाराकडेच? डोळ्यासमोरच्या बांगलादेशींचा सुगावा नाही; फरासखाना पोलिसांच्या तपास यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह

मास्टर स्ट्रोक ठरणार गेमचेंजर !

नुकत्याच झालेल्या लोणावळा व तळेगाव दाभाडे नगरपरिषद तसेच वडगाव नगरपंचायत निवडणुकीत आमदार सुनील शेळके यांचा मास्टर स्ट्रोक राष्ट्रवादीच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्यामुळे या निवडणुकीत पुन्हा आमदार शेळके यांचा मास्टर स्ट्रोक बाजी मारणार की माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचा मास्टर स्ट्रोक बाजी मारणार अशी उत्सुकता होती पण या निवडणुकीत दोन्ही पक्षांकडून पर्चेस व्होटिंग चा फंडा वापरला गेल्याने या निवडणुकीत मास्टर स्ट्रोक नव्हे तर बुस्टर डोस गेमचेंजर ठरणार असल्याची चर्चा आहे.

BJP NCP alliance South Raigad
Pune ZP Panchayat election: पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक : 68.89 टक्के मतदान; राजगडमध्ये सर्वाधिक, बारामतीत सर्वात कमी

यापूर्वी असे होते पक्षीय बलाबल

जिल्हापरिषद : भाजप 2, राष्ट्रवादी 3

पंचायत समिती : भाजप 7, राष्ट्रवादी 3

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news