Pawar family meeting: बारामतीत पवार कुटुंबीयांच्या बैठकांचे सत्र सुरूच

अजित पवारांच्या निधनानंतर सलग चौथ्या दिवशी विद्या प्रतिष्ठानमध्ये खलबतं; राजकीय एकत्रिकरणाची चर्चा
Sharad Pawar
Sharad PawarPudhari
Published on
Updated on

बारामती : बारामतीत पवार कुटुंबातील महत्त्वाच्या व्यक्तींच्या बैठकांचे सत्र सुरूच आहे. शनिवारी सलग चौथ्या दिवशी पवार कुटुंबीयांची बैठक विद्या प्रतिष्ठान येथे झाली. आजच्या बैठकीला ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, रोहित पवार, राजेंद्र पवार, अजित पवार यांचे पुत्र पार्थ आणि जय पवार उपस्थित होते.

Sharad Pawar
Faraskhana Police Investigation: सोनेरी गुन्ह्यांचा तपास फक्त ‘त्या’ फौजदाराकडेच? डोळ्यासमोरच्या बांगलादेशींचा सुगावा नाही; फरासखाना पोलिसांच्या तपास यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह

अजित पवार यांच्या निधनानंतर गेल्या चार दिवसांत सलग पवार कुटुंबांच्या विद्या प्रतिष्ठान आणि सहयोग या अजित पवारांच्या निवासस्थानी भेटी होत आहेत. या भेटीची वारंवारताही वाढलेली आहे. यावरून राजकीय तर्कवितर्क लावले जात आहेत. परंतु यासंदर्भात कोणीही औपचारिक किंवा अनौपचारिकरीत्या बोलण्यास तयार नाही. रोहित पवारांनी मात्र आपण यासंदर्भात 10 आणि 12 तारखेला बोलू, असे सांगितले आहे.

Sharad Pawar
Pune ZP Panchayat election: पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक : 68.89 टक्के मतदान; राजगडमध्ये सर्वाधिक, बारामतीत सर्वात कमी

विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्तपदी अजित पवार यांच्या जागी त्यांच्या कुटुंबातील कोणाला घ्यायचे आणि अजितदादांचे विद्या प्रतिष्ठानमधील स्मारक या भोवतीच पवार कुटुंबाची चर्चा होत असल्याचे सांगितले जात असले, तरी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण आणि राजकीयदृष्ट्या संपूर्ण पवार कुटुंब एकत्र येणे या संदर्भातही काही महत्त्वपूर्ण चर्चा होत असल्याचे समजते.

Sharad Pawar
Wild Animal Attack Pune | वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ऊसतोड मजुराच्या ५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू ; फडात आढळला रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह

राजकीयदृष्ट्या सध्या पवार कुटुंब अडचणीत असल्यामुळे सर्व कुटुंब राजकीयदृष्ट्या एकत्रितपणे भक्कमपणे उभे राहिले पाहिजे, असे कुटुंबातील सर्व घटकांचे मत असल्यामुळे त्यासंदर्भातही या बैठकीत चर्चा होत असल्याचे समजते. विलीनीकरणासंदर्भात सध्या वेगवेगळे नेते त्यांची मते व्यक्त करत असले, तरी अंतिमत: पवार कुटुंब एकत्र होऊन जो निर्णय घेईल तोच महत्त्वाचा ठरणार असल्याने या बैठकांना महत्त्व प्राप्त झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news