Micro Drama Series: एक-दोन मिनिटांत गोष्ट सांगणारी ‘मायक्रो ड्रामा सीरिज’ तरुणाईची नवी क्रेझ

इन्स्टाग्राम-फेसबुकवर धुमाकूळ; अभिनय, दिग्दर्शन आणि करिअरसाठी उघडतेय नवी दारे
Micro Drama Series
Micro Drama SeriesPudhari
Published on
Updated on

पुणे : अर्धा तास ते 45 मिनिटांच्या वेब सीरिज आपण ओटीटी व्यासपीठावर पाहिल्याच असतील, त्याला प्रतिसादही आहे. पण, आता सर्वाधिक ट्रेंड आहे तो मायक्रो ड्रामा सीरिजचा. सध्या सोशल मीडियावर मायक्रो ड्रामा सीरिजची धूम असून, तरुणाईकडून या मायक्रो ड्रामाची निर्मिती वाढली आहे. मायक्रो ड्रामा सीरिज म्हणजे एक ते दोन मिनिटांच्या लहान व्हिडीओंची मालिका (सीरिज). एका कथेवर किंवा विषयाला अनुसरून छोट्या व्हिडीओंची आठ ते दहा भागांची मालिका तयार केली जाते आणि त्यातील एक व्हिडीओ रोज इन्स्टाग््रााम, फेसबुक, विविध ॲपवर अपलोड केला जातो. खासकरून प्रेमकथा, रहस्यकथा, विनोदी, सामाजिक प्रश्न, नातेसंबंध अशा वेगवेगळ्या विषयांवर या सीरिजची निर्मिती केली जात असून, इन्स्टाग््रााम, फेसबुकवर त्याला चांगले व्ह्युव्ज मिळत आहेत. 20 ते 35 वयोगटातील तरुणाई मायक्रो ड्रामा सीरिजची निर्मिती करत आहे.

Micro Drama Series
PMC BJP Majority: तुफानी बहुमत मिळालं; आता जबाबदारीने वागा

सध्या ओटीटी व्यासपीठावरील वेब सीरिज पाहणाऱ्या तरुणांची संख्या मोठी आहेच. पण, आता कलेच्या दुनियेत मायक्रो ड्रामा सीरिजचीही क्रेझ वाढली आहे. इतर देशांमध्ये गाजलेला मायक्रो ड्रामा सीरिजचा ट्रेंड भारतातही गाजतोय. अनेक तरुणांकडून, तरुणांच्या ग््रुापकडून अशा सीरिजची निर्मिती केली जात आहे. एक ते दोन मिनिटांच्या लहान व्हिडीओंच्या आठ ते दहा भागांच्या मालिकेतून एखादा विषय किंवा कथा नेटिझन्सपर्यंत पोचविण्याचे काम यातून केले जात आहे. पुण्यातील अनेक तरुण-तरुणी आणि तरुणांचे ग््रुाप मायक्रो ड्रामा सीरिजच्या निर्मितीत उतरले असून, त्यांच्या या सीरिज गाजताहेत. रहस्यकथा आणि विनोदी कथांवर अधारित मायक्रो ड्रामा सीरिजला सर्वाधिक प्रतिसाद असून, तरुणाईच्या या प्रयत्नाला प्रतिसादही मिळत आहे. अनेकांसाठी हा करिअरचा नवीन पर्याय बनले असून, या सीरिजमुळे काहींना बॅण्ड प्रमोशन, तर काहींना दुसऱ्या संस्थांसाठी अशाच सीरिज तयार करण्यासाठीची कामे मिळत आहेत.

Micro Drama Series
Pawar family meeting: बारामतीत पवार कुटुंबीयांच्या बैठकांचे सत्र सुरूच

याविषयी मायक्रो ड्रामा सीरिजचे दिग्दर्शक अमेय येरलकर म्हणाले, मायक्रो ड्रामा सीरिजची इन्स्टाग््रााम, फेसबुक आणि विविध ॲपवर धूम आहे. मीसुद्धा ‌’कॅज्युअली सिरीयस‌’ या दहा भागांच्या सीरिजची निर्मिती केली आणि इन्स्टाग््राामवर या सीरिजला चांगला प्रतिसाद मिळाला. आता आणखी एका सीरिजची निर्मिती करत आहे. मी स्वत: सीरिजच्या संहितेचे, संवादाचे लेखन, सीरिजच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळतो. एखाद्या कथेवर आधारित सीरिजमध्ये अनेक तरुणांना अभिनय करण्याची संधी मिळत असून, सीरिजमधील त्यांच्या कामामुळे त्यांना नवी ओळखही मिळत आहे. मायक्रो ड्रामा सीरिजच्या प्रत्येक भागाविषयी प्रेक्षकांच्या मनात एक उत्सुकता असते. त्यामुळेच सीरिजच्या प्रत्येक भागाला चांगले व्ह्युव्ज मिळतात.

Micro Drama Series
Faraskhana Police Investigation: सोनेरी गुन्ह्यांचा तपास फक्त ‘त्या’ फौजदाराकडेच? डोळ्यासमोरच्या बांगलादेशींचा सुगावा नाही; फरासखाना पोलिसांच्या तपास यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह

काय आहे मायक्रो ड्रामा आणि वेब सीरिजमध्ये फरक?

मायक्रो ड्रामा सीरिज हे वेब सीरिजप्रमाणेच असते. वेब सीरिजचा एक भाग 30 ते 45 मिनिटांचा असतो. पण, मायक्रो ड्रामा सीरिजमधला एक भाग हा एक ते दोन मिनिटांचा असतो. एका विषयाला अनुसरून किंवा कथेवर आधारित एक ते दोन मिनिटांचे वेगवेगळे व्हिडीओ शूट केले जातात, या व्हिडीओंची एडिटिंग करून व्हिडीओंची आठ ते दहा भागांची व्हिडीओ मालिका तयार केली जाते आणि त्यातील एक भाग दररोज इन्स्टाग््रााम, फेसबुक, यू-ट्यूब आणि विविध ॲपवर अपलोड केला जातो. या सीरिजचे संहितेचे लेखन, अभिनय, नेपथ्य, रंगभूषा, लोकेशन निवडणे, व्हिडीओ शूट, एटिडिंग, अशी सर्व कामे तरुण-तरुणींचे ग््रुाप करतात. प्रत्येकाला एक जबाबदारी सोपविलेली असते. त्याप्रमाणे या सीरिज शूट केल्या जातात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news