PMPML Bus: मुकाई चौकापुढील मामुर्डी परिसराला ३६७ क्रमांकाची पीएमपीएमएल बससेवा द्या

वाढत्या गृहसंकुलांमुळे प्रवाशांची संख्या वाढली; विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक व नोकरदारांची खासगी वाहनांवर भिस्त
PMPML
PMPMLPudhari
Published on: 
Updated on: 

रावेत: मुकाई चौकापुढे मामुर्डीच्या दिशेने मोठ्या प्रमाणात गृहसंकुले विकसित झाली आहेत. या परिसरात नियमित सार्वजनिक बससेवा उपलब्ध नसल्याने स्‍थानिक प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे भोसरी-मुकाई चौक मार्गावर धावणारी पीएमपीएमएलची ३६७ क्रमांकाची बस समीर लॉन्स–किवळेगाव मार्गे गोदरेज सोसायटी, मामुर्डीपर्यंत विस्तारित करावी, अशी मागणी परिसरातील प्रवाशांकडून होत आहे.

PMPML
Pavana Dam Protest: पवना धरणग्रस्तांचे जलसमाधी आंदोलन स्थगित; सरकारला २० दिवसांचा अल्टिमेटम

सध्या ३६७ क्रमांकाची बस मुकाई चौकापर्यंत येत असल्याने राऊत चौकापुढील विविध गृहसंकुलांमधील नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीसाठी खासगी वाहनांवर अवलंबून राहवे लागत आहे. या भागातून विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, नोकरदार तसेच इतर नागरिक दररोज मोठ्या संख्येने प्रवास करतात. मात्र, नियमित बससेवा नसल्याने त्यांना अतिरिक्त प्रवास खर्च आणि गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

PMPML
Pimpri Chinchwad Scrap Transport: पिंपरी-चिंचवडच्या रस्त्यांवर उघड्या वाहनांतून स्क्रॅप वाहतूक; दुचाकीस्वारांच्या सुरक्षेला धोका

राऊत चौकापुढील प्रवाशांची गैरसोय

राऊत चौक, मामुर्डी परिसरापासून पुढे लिटल अर्थमध्ये सुमारे एक हजार सदनिका, लोढा परिसरात सुमारे एक हजार सदनिका, कुंजबेन व इतर लहान गृहसंकुलांमध्ये सुमारे ४०० सदनिका, सिटी वनमध्ये २००, कुणाल आयकॉनियामध्ये ५००, गोदरेज सोसायटीमध्ये ६०० आणि ॲड्रेस वनमध्ये सुमारे ३०० सदनिका आहेत. त्यापुढे साईनगर परिसराचाही विस्तार होत आहे. या गृहसंकुलांमध्ये मोठ्या संख्येने नागरिक वास्तव्यास असून, परिसराचा विस्तार सुरूच आहे. त्यामुळे भविष्यात सार्वजनिक वाहतुकीची गरज आणखी वाढण्याची शक्यता आहे. वाढत्या नागरीकरणाच्या तुलनेत बससेवा मात्र अपुरी असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.

PMPML
Matrugandh Foundation: आयटी क्षेत्रातील नोकरी सांभाळत मराठी संवर्धनाची चळवळ; ‘मातृगंध’ची १३५० हून अधिक वाचनसत्रे

..असा असावा प्रस्तावित बसमार्ग

रहिवाशांनी ३६७ क्रमांकाच्या बसचा मार्ग मुकाई चौक–समीर लॉन्स, रावेत–कातळे वस्ती–किवळे गाव–सिम्बायोसिस विद्यापीठ–राऊत चौक–कुणाल आयकॉनिया–गोदरेज सोसायटी असा करण्याची मागणी केली आहे. गोदरेज सोसायटी येथे अंतिम थांबा देण्यात यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. या मार्गावर नियमित बससेवा सुरू झाल्यास मामुर्डी परिसरातील अनेक गृहसंकुलांमधील नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा थेट पर्याय उपलब्ध होणार आहे. विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि नोकरदार वर्गाची गैरसोय कमी होण्यासोबतच परिसरातील वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीनेही ही सेवा उपयुक्त ठरू शकते.

नोकरदारांनाही मेट्रोपर्यंत पोहोचणे सोपे होणार

परिसरातील अनेक नागरिक पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागांत नोकरीसाठी प्रवास करतात. बससेवा उपलब्ध झाल्यास त्यांना पुढील प्रवासासाठी मेट्रो स्थानक किंवा इतर सार्वजनिक वाहतूक सुविधांपर्यंत पोहोचणे सुलभ होणार आहे. त्यामुळे खासगी वाहनांचा वापर कमी करण्यासही मदत होऊ शकते.

PMPML
Pimpri Chinchwad Out of School Children: पिंपरी-चिंचवडमध्ये १२४ बालके आढळली शाळाबाह्य; ११७ बालकांना पुन्हा शाळेत दाखल

बाजारपेठेसाठीही खासगी वाहनांवर अवलंबित्व

परिसरातील गृहिणींनाही नियमित बससेवेअभावी गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. पिंपरी बाजारपेठेत खरेदीसाठी जाताना सध्या खासगी वाहन किंवा ओला-उबेरसारख्या प्रवासी सेवांवर अवलंबून राहावे लागत असल्याचे महिलांनी सांगितले. घरातील दैनंदिन खरेदीसाठी पिंपरी बाजारात जायचे असल्यास सार्वजनिक वाहतुकीचा सोयीचा पर्याय उपलब्ध नाही. बससेवा सुरू झाल्यास महिलांसह ज्येष्ठ नागरिक आणि इतर रहिवाशांनाही मोठा फायदा होईल.

विद्यार्थ्यांची उडतेय तारांबळ

परिसरातील विद्यार्थ्यांना दररोज महाविद्यालयीन शिक्षणासाठी प्रवास करावा लागतो. शहरातील विविध शैक्षणिक संकुलामध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. बससेवा सुरू झाल्यास विद्यार्थ्यांना नियमित आणि परवडणाऱ्या सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो. यामुळे विद्यार्थ्यांना खासगी वाहतुकीचा पर्याय निवडावा लागणार नाही. तसेच आर्थिक लूट होणार आहे. पीएमपीएमएल सेवा वेळेत मिळत नसल्याने विद्यार्थ्यांची तारांबळ उडत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news