Pimpri Crime: चऱ्होली बुद्रुकमध्ये 75 वर्षीय महिलेची निर्घृण हत्या; परिसरात खळबळ

गळा चिरलेल्या अवस्थेत वृद्ध महिलेचा मृतदेह; दिघी पोलिसांकडून सीसीटीव्ही व नातेवाईकांच्या चौकशीला वेग
Elderly Woman
Elderly WomanPudhari
Published on
Updated on

पिंपरी: दिघी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चऱ्होली बुद्रुक येथील काळजेवाडी परिसरात एका ७५ वर्षीय वृद्ध महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली. मृतदेह घरामध्ये गळा चिरलेल्या अवस्थेत आढळून आला. ही घटना मंगळवारी (दि. १६) दुपारी दोन ते सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. शकुंतला काळूराम गिलबिले असे मृत महिलेचे नाव आहे.

Elderly Woman
Cyber Fraud Refund: सायबर फसवणुकीत दिलासा; गोठवलेली रक्कम आता घरबसल्या परत मिळणार

वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी दिलेल्या माहितीनुसार, शकुंतला गिलबिले या चऱ्होली बुद्रुक येथील काळजेवाडी परिसरातील घरात एकट्याच राहत होत्या. त्यांच्या पतीचे यापूर्वी निधन झाले आहे. त्यांचा मुलगा अलीकडेच फ्लॅटमध्ये राहण्यासाठी गेल्याने त्या सध्या एकट्याच वास्तव्य करत होत्या. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी त्यांचा मृतदेह घरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

Elderly Woman
Pimpri Gurav Bakery Issue: पिंपळे गुरवमध्ये बेकरी पदार्थांबाबत गंभीर प्रश्न; अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन

त्यानंतर दिघी पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाची पाहणी करताना पोलिसांना महिलेचा गळा धारदार शस्त्राने चिरल्याचे दिसून आले. सुरुवातीला चोरीच्या उद्देशातून हा प्रकार घडला असावा, असा संशय व्यक्त करण्यात आला. मात्र, मृत महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने तसेच असल्याचे तपासात आढळून आल्याने केवळ चोरीसाठी हत्या करण्यात आल्याची शक्यता कमी असल्याचे पोलिसांचे मत आहे.

Elderly Woman
Lonavala Bungalow Party Raid: लोणावळ्यात बंगल्यातील पार्टीवर पोलिसांचा छापा; १८ जणांवर गुन्हा दाखल

सीसीटीव्ही फुटेजची केली तपासणी

यामुळे आता पोलिसांनी प्रॉपर्टीच्या वादासह अन्य वैयक्तिक कारणांच्या दिशेनेही तपास सुरू केला आहे. महिलेच्या नातेवाईकांची चौकशी करण्यात येत असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेची विविध पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत.

Elderly Woman
Lonavala Smart Meter Protest: लोणावळ्यात स्मार्ट मीटर सक्तीवरून तीव्र विरोध; कार्यालयाला टाळे, आंदोलनांची मालिका

परिसराची नाकाबंदी करून संशयितांचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. फॉरेन्सिक तज्ज्ञांनीही घटनास्थळाची पाहणी करून महत्त्वाचे नमुने ताब्यात घेतले आहेत. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. तपास दिघी पोलिस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news