Lonavala Bungalow Party Raid: लोणावळ्यात बंगल्यातील पार्टीवर पोलिसांचा छापा; १८ जणांवर गुन्हा दाखल

मध्यरात्री मोठ्या आवाजात पार्टी, मद्यपान व अश्लील कृत्यांप्रकरणी पुराणिक सोसायटीत कारवाई
Party
PartyPudhari
Published on
Updated on

लोणावळा: शहरात पर्यटकांच्या गर्दीचा फायदा घेत काही ठिकाणी नियमबाह्य कृत्ये केली जात असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. लोणावळ्यातील मुख्य भागात असलेल्या 'पुराणिक सोसायटी'मधील एका बंगल्यात मध्यरात्रीच्या सुमारास मोठ्या आवाजात संगीत लावून, दारूचे सेवन करत अश्लील कृत्य करणाऱ्या १८ जणांच्या टोळीवर शहर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत ९ पुरुष आणि ७ महिलांसह बंगल्याचा केअरटेकर आणि मालकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Party
Lonavala Smart Meter Protest: लोणावळ्यात स्मार्ट मीटर सक्तीवरून तीव्र विरोध; कार्यालयाला टाळे, आंदोलनांची मालिका

मिळालेल्या माहितीनुसार, १५ जून २०२६ रोजी पहाटे १.३० च्या सुमारास लोणावळा शहर पोलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना भांगरवाडीतील पुराणिक सोसायटीच्या बंगल्यातून (बंगला क्र. १३५) मोठ्या आवाजात गाण्याचा आवाज येत असल्याचे निदर्शनास आले. या आवाजामुळे परिसरातील शांततेचा भंग होत होता. पोलिसांनी तातडीने सदर बंगल्यावर छापा टाकला असता, तिथे अनेक तरुण-तरुणी मद्यपान करत असल्याचे आढळले.

Party
Maharashtra RTO Employees Strike: आरटीओ कर्मचारी बेमुदत संपावर; वाहनसेवांवर परिणाम होण्याची शक्यता

लोणावळा शहर पोलिस स्टेशनचे पो. कॉ. राहुल चोरगे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी एकूण १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलिसांनी दारूच्या बाटल्या, रिकामे कॅन आणि आरोपींकडे असलेले महागडे मोबाईल असा एकूण ३ लाख ९० हजार २२५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Party
Pimpri Chinchwad Water Crisis: पाणी कपातीचे संकट; जलतरण तलाव बंद, वॉशिंग सेंटरवर कारवाईचे आदेश

अश्लील कृत्य, नियमांचे उल्लंघन

आरोपींनी सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालून अश्लील कृत्य केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याशिवाय, त्यांच्याकडे कोणतीही परवानगी नसताना मद्य बाळगणे आणि त्याचे सेवन करणे सुरू होते. विशेष म्हणजे, बंगल्याच्या मालकाने पोलिसांना कोणतीही पूर्वसूचना न देता हा बंगला भाड्याने दिला होता, तर केअरटेकरने या कृत्याला सोयीस्कर मदत केली होती.

Party
Pimpri Illegal School Book Sale: शाळेत बेकायदेशीर पुस्तकविक्रीवर छापा; खासगी प्रकाशनाची पुस्तके जप्त

बंगल्याचा अवैध वापराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

या कारवाईमुळे शहरात विनापरवाना चालणाऱ्या बंगल्यांच्या व्यवसायावर आणि पर्यटकांच्या नावाखाली चालणाऱ्या अवैध कृत्यांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे व पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस निरीक्षक राहुल लाड, रिया राणे, मयूर आबनावे, भूषण कुंवर, राहुल चोरघे, प्रीती गवारी, प्राजक्ता सुतार, सिध्देश्वर शिंदे, आतिष आदलिंगे, तेलंग यांनी ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news