Pimpri Gurav Bakery Issue: पिंपळे गुरवमध्ये बेकरी पदार्थांबाबत गंभीर प्रश्न; अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन

केक, ब्रेड व क्रीमरोलवर उत्पादन तारीख व बॅच नंबर गायब; आरोग्य धोक्यात असल्याने तपासणीची मागणी
Pimpri Gurav Bakery Issue
Pimpri Gurav Bakery IssuePudhari
Published on
Updated on

उमेश सणस

पिंपळे गुरव: पिंपळे गुरव येथील काही बेकरी दुकानांमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या मफिन, फ्रूट केक, क्रीमरोल आणि दैनंदिन आहारात वापरल्या जाणाऱ्या स्लाईस ब्रेडसारख्या पॅकबंद बेकरी पदार्थांच्या पॅकेजिंगवरून अत्यंत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. अनेक उत्पादनांवर उत्पादन तारीखच गायब आहे. धक्कादायक बाब म्हणजे बहुतेक केकच्या पाकिटांवर बॅचनंबरसुद्धा लिहिलेले नाहीत. त्यातच आता लहान मुलांच्या आवडीच्या क्रीमरोलमधील क्रीम दर्जाहीन आणि सुकलेली आढळत असल्याने हा थेट नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याने संताप व्यक्त होत आहे.

Pimpri Gurav Bakery Issue
Lonavala Bungalow Party Raid: लोणावळ्यात बंगल्यातील पार्टीवर पोलिसांचा छापा; १८ जणांवर गुन्हा दाखल

स्थानिक बेकरीमध्ये विक्रीसाठी ठेवलेल्या चॉकलेट मफिन, मिक्स फ्रूट केक आणि क्रीमरोलच्या पाकिटांची पाहणी केली असता, नियम धाब्यावर बसवल्याचे चित्र समोर आले आहे. काही पाकिटांवर फक्त EXP 15/06/2026 आणि EXP 15/07/2026 असे थेट महिना-दोन महिन्यांनी संपणारे एक्सपायरी डेटचे शिक्के मारण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.

अन्न सुरक्षा विभागाने या प्रकाराची तात्काळ दखल घेणे गरजेचे आहे. पिंपळे गुरवमधील बेकरींमध्ये अचानक तपासणी करून संशयास्पद ब्रेड, केक आणि सुकलेल्या क्रीमच्या क्रीमरोलचे नमुने प्रयोगशाळेत पाठवावेत आणि ग्राहकांच्या जिवाशी खेळणाऱ्या बेजबाबदार उत्पादकांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे.

Pimpri Gurav Bakery Issue
Lonavala Smart Meter Protest: लोणावळ्यात स्मार्ट मीटर सक्तीवरून तीव्र विरोध; कार्यालयाला टाळे, आंदोलनांची मालिका

ग्राहकांनो, खरेदी करताना हे नक्की तपासा!

  • पाकिटावर उत्पादन तारीख (Mfg Date) आणि बॅच नंबर (Batch No.) छापलेला आहे का?

  • बेस्ट बिफोर'' किंवा एक्सपायरी तारीख स्पष्ट वाचता येते का? (की फक्त वरून शिक्का मारला आहे?)

  • FSSAI चा १४ अंकी परवाना क्रमांक पाकिटावर आहे का?

  • क्रीमरोल किंवा केक घेताना तो हाताने दाबून पहा, तो प्रमाणापेक्षा जास्त कडक किंवा कोरडा वाटल्यास खरेदी टाळा.

  • ब्रेडवर कुठेही पांढरट किंवा काळे डाग (बुरशी) दिसत आहेत का?

आठ दिवस जुना ब्रेड खाणे सुरक्षित आहे का?

दररोज सकाळी घरोघरी खाल्ल्या जाणाऱ्या स्लाईस ब्रेडच्या पाकिटांवरही फक्त एक्सपायरी डेट टाकली जात आहे. सामान्यतः ब्रेड हा ३ ते ४ दिवसांत खराब होतो. मात्र, त्यावर आठ ते दहा दिवसांनंतरची एक्सपायरी डेटचा शिक्का मारून तो बाजारात विकला जात आहे. हवेतील दमटपणामुळे ब्रेडवर बुरशी येण्याची शक्यता असते, जी आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे.

Pimpri Gurav Bakery Issue
Maharashtra RTO Employees Strike: आरटीओ कर्मचारी बेमुदत संपावर; वाहनसेवांवर परिणाम होण्याची शक्यता

नियम काय सांगताे?

अन्न सुरक्षा नियमांनुसार कोणत्याही पॅकबंद खाद्यपदार्थावर उत्पादनाची तारीख आणि बॅच क्रमांक असणे अनिवार्य आहे. बॅचनंबर नसल्यास तो पदार्थ नेमका कधी आणि कुठे तयार झाला, याची नोंद तपासता येत नाही. पिंपळे गुरवमधील उत्पादनांवरून हीच महत्त्वाची माहिती गायब असल्याने अन्न सुरक्षा नियमांचे सरळ-सरळ उल्लंघन होत आहे.

अन्नातून विषबाधा होण्याचा धोका

या संपूर्ण प्रकारात ग्राहकांनी एक अत्यंत धक्कादायक निरीक्षण नोंदवले आहे. पूर्वी क्रीमरोल खाताना आतमध्ये मऊ आणि ताजी क्रीम लागायची. मात्र, आता पिंपळे गुरवमधील बेकरीत मिळणाऱ्या क्रीमरोलमध्ये त्या मऊ क्रीमऐवजी वेगळ्याच प्रकारची सुकलेली, कडक आणि चिवट क्रीम पाहायला मिळत आहे. क्रीमरोल किंवा पेस्ट्रीमधील क्रीम ही दूध, डालडा किंवा बटरपासून बनते. जर क्रीम सुकलेली किंवा कडक झाली असेल, तर याचा अर्थ तो पदार्थ जुना आहे किंवा त्यात निकृष्ट दर्जाचे तेल/डालडा वापरण्यात आले आहे. अशी सुकलेली क्रीम पोटात गेल्यास लहान मुलांना तीव्र पोटदुखी, उलट्या आणि अन्नातून विषबाधा (Food Poisoning) होण्याचा मोठा धोका असतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.

Pimpri Gurav Bakery Issue
Pimpri Chinchwad Water Crisis: पाणी कपातीचे संकट; जलतरण तलाव बंद, वॉशिंग सेंटरवर कारवाईचे आदेश

पिंपळे गुरव परिसरातील सर्व बेकरी व पॅकबंद खाद्यपदार्थ विक्री केंद्रांची अचानक तपासणी करून उत्पादन तारीख, बॅच नंबर, एफएसएसएआय परवाना आणि खाद्यपदार्थांचा दर्जा संंबंधित प्रशासनाने तपासावा. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करावे.

बबलू चकाले, सामाजिक कार्यकर्ता, पिंपळे गुरव

लहान मुलांसाठी आपण केक, क्रीमरोल आणि मफीन विकत घेतो. पण त्यावर उत्पादन तारीख आणि बॅच नंबरच नसेल तर त्या पदार्थांवर विश्वास कसा ठेवायचा. प्रशासनाने तातडीने तपासणी करून दोषींवर कारवाई करावी.

नंदिनी सोनवणे, गृहिणी, पिंपळे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news