

पिंपरी: महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने संत तुकारामनगर, कासारवाडी व खराळवाडी मंडळाची बैठक आमदार अमित गोरखे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
या वेळी पुणे पदवीधर मतदारसंघाच्या भाजप उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव यांना विजयी करण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन आमदार गोरखे यांनी केले.
या वेळी पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, भाजपा शहर सरचिटणीस वैशाली खाडे, महिला मोर्चा अध्यक्षा सुजाता पालांडे, माजी नगरसेवक माऊली थोरात, मंडळाध्यक्ष मंगेश घाडगे, शहर सचिव मुन्ना बाविस्कर, नंदू कदम, किरण सुवर्णा, सुनील पालांडे, युवराज लांडे, सतीश नागरगोजे, राहुल खाडे, देवदत्त लांडे, सचिन बंदी यांच्यासह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक तयारी, प्रचाराचे नियोजन आणि पदवीधर व शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक कार्यवाही याबाबत चर्चा करण्यात आली. भाजपा संघटन मजबूत करूया, महायुतीच्या विजयासाठी एकजुटीने कार्य करूया! असा संकल्प या वेळी करण्यात आला.