Pune MLC Election: पुणे पदवीधर, शिक्षक निवडणुकीत विजयासाठी भाजपची मोर्चेबांधणी; आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीत नियोजन बैठक

डॉ. स्मिता जाधव आणि कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारासाठी मतदार संपर्क व बूथनिहाय नियोजनावर भर
Pune MLC Election
Pune MLC ElectionPudhari
Published on: 
Updated on: 

पिंपरी: आगामी पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजपा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, प्रभारी आणि कार्यकर्त्यांची एकत्रित नियोजन बैठक आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीत पार पडली.

निवडणुकीची पूर्वतयारी, प्रचार यंत्रणेचे नियोजन आणि मतदारांशी प्रभावी संपर्क साधण्याच्या दृष्टीने बैठकीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

Pune MLC Election
Pune Graduate Teacher Election: पदवीधर, शिक्षक मतदारसंघात महायुतीचा विजय निश्चित; शंकर जगतापांचा विजयाचा विश्वास

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या भाजपा-महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव आणि पुणे शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारासाठी संघटनात्मक यंत्रणा अधिक सक्रिय करण्यावर भर देण्यात आला.

मतदार संपर्क, बूथनिहाय जबाबदाऱ्यांचे वाटप आणि पदाधिकारी व कार्यकर्त्यांमधील समन्वय अधिक मजबूत करण्याबाबत आमदार लांडगे यांनी मार्गदर्शन केले.पदवीधर आणि शिक्षक मतदारांच्या अपेक्षा, स्थानिक प्रश्न व अडचणी समजून घेण्यासाठी त्यांच्याशी सातत्यपूर्ण संवाद साधणे आवश्यक असल्याचे लांडगे यांनी सांगितले.

Pune MLC Election
Pimpri Chinchwad Theatre News: शहरातील दोन नाट्यगृहे बंद; संस्थांवर कार्यक्रमासाठी वणवण करण्याची वेळ

मतदारांपर्यंत पोहोचताना त्यांच्या प्रश्नांना प्राधान्य द्यावे. प्रत्येक स्तरावरील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपापली जबाबदारी ओळखून नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

प्रचारातील सातत्य आणि परस्पर समन्वयाच्या माध्यमातून मतदार संपर्काला गती देण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. दोन्ही उमेदवारांना पहिल्या पसंतीचे मत मिळवून देण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचा निर्धार उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनाखाली पुण्यासह राज्यातील पाचही जागांवर विजय मिळवण्याचा संकल्प पक्षाने केला आहे, असे आमदार लांडगे यांनी यावेळी स्पष्ट केले.

शिक्षक आणि पदवीधर हे समाजाच्या प्रगतीला दिशा देणारे महत्त्वाचे घटक आहेत. त्यांच्या अपेक्षा आणि प्रश्न समजून घेऊन त्यांच्याशी सातत्याने संवाद साधणे, ही आमची जबाबदारी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनाखाली पुण्यासह राज्यातील पाचही जागांवर विजय मिळवण्याचा संकल्प भाजपाने केला आहे. संघटनेची ताकद आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीच्या बळावर हा संकल्प साकार होईल, असा विश्वास आहे.

- महेश लांडगे, आमदार, भोसरी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news