Pune Graduate Teacher Election: पदवीधर, शिक्षक मतदारसंघात महायुतीचा विजय निश्चित; शंकर जगतापांचा विजयाचा विश्वास

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी चिंचवडमध्ये संघटनात्मक बैठक
Pune Graduate Teacher Election
Pune Graduate Teacher ElectionPudhari
Published on: 
Updated on: 

पिंपरी: योजनाबद्ध प्रयत्नांच्या बळावर पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास चिंचवड मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांनी व्यक्त केला. निवडणुकीच्या तयारीसाठी चिंचवड येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते गुरुवारी (दि. १५) बोलत होते.

या बैठकीला भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, माजी महापौर तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष योगेश बहल, सरचिटणीस मधुकर बच्चे, मोरेश्वर शेंडगे, चिंचवड मतदारसंघातील मंडल अध्यक्ष गणेश ढोरे, ॲड. हर्षद नढे, सोमनाथ तापकीर, सनी बारणे, मोहन राऊत यांच्यासह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी, मतदारसंघातील सर्व नगरसेवक, नगरसेविका, भाजपचे पदाधिकारी आणि मंडलाध्यक्ष उपस्थित होते.

Pune Graduate Teacher Election
Pimpri Chinchwad Theatre News: शहरातील दोन नाट्यगृहे बंद; संस्थांवर कार्यक्रमासाठी वणवण करण्याची वेळ

आमदार जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत निवडणुकीची पूर्वतयारी, मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठीचे नियोजन आणि संघटनात्मक जबाबदाऱ्यांबाबत चर्चा करण्यात आली.

Pune Graduate Teacher Election
Lonavala Fake Call Center: लोणावळ्यात बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश; २० जणांना अटक, ३६.४१ लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या भाजप उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ मुरलीधर गावडे यांना विजयी करण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन आमदार जगताप यांनी केले.

महायुतीतील सर्व घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकजुटीने निवडणुकीच्या तयारीला लागावे, यासाठी बैठकीत सूचना देण्यात आल्या. मतदारांशी थेट संपर्क साधून नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्यात येत आहे. संघटनात्मक ताकद आणि नियोजनाच्या माध्यमातून दोन्ही उमेदवारांच्या विजय निश्चित आहे.

- शंकर जगताप, आमदार, चिंचवड.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news