पुणे: पारगावचा गावकारभारी होण्यासाठी सर्वांना संधी, गावात विविध गट झाले सक्रिय; बरेच जण गुडघ्याला बाशिंग बांधून

पुणे: पारगावचा गावकारभारी होण्यासाठी सर्वांना संधी, गावात विविध गट झाले सक्रिय; बरेच जण गुडघ्याला बाशिंग बांधून
Published on
Updated on

राजेंद्र खोमणे

नानगाव (पुणे) : दौंड तालुक्यातील राजकीय पटलावरील महत्त्वाच्या व मोठ्या समजल्या जाणार्‍या पारगाव ग्रामपंचायत निवडणुकीत यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत सरपंचपद हे खुल्या प्रवर्गासाठी आहे. त्यामुळे सरपंचपदासाठी गावातील कोणत्याही प्रवर्गातील नागरिक निवडणूक लढवून सरपंचपदी विराजमान होऊ शकतो. त्यामुळे यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत सर्वांनाच गावकारभारी होण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

मागील पंचवार्षिक निवडणुकीत पारगावचे सरपंचपद हे सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी होते. त्यानंतर मधल्या काळात सरकार बदलले आणि जनतेतून सरपंचपद रद्द झाले. मात्र, पुन्हा पुढे सरकार बदलले आणि पुन्हा एकदा जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय झाला. त्यामुळे पारगावकरांना यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत देखील जनतेतून सरपंच निवडण्याच्या प्रक्रियेतून जावे लागणार आहे.

पारगावात सध्या प्रामुख्याने भाजप म्हणजेच आमदार राहुल कुल गट आहे. तसेच माजी आमदार रमेश थोरात यांचा एक गट असला तरी स्थानिक निवडणुकीत थोरात गटात दुफळी असल्याचे मागील निवडणुकीत दिसून आले आहे. थोरातसमर्थक दुसरा गटदेखील गावात चांगलाच तुल्यबळ आहे. तसेच गावात युवकांचा मागील काही काळापासून देखील एक गट कार्यरत आहे. त्यातच आता आरक्षण नसल्याने एक वेगळाच गट तयार होत आहे. सरपंचपद हे खुल्या प्रवर्गातून असल्याने प्रत्येक इच्छुक मागील काही दिवसांपासून गुडघ्याला बाशिंग लावून बसले आहेत. मात्र, प्रभागनिहाय आरक्षणामुळे सध्या वेगळीच राजकीय गणिते गावात सुरू झाल्याच्या गुप्त चर्चांना उधाण आले आहे. सध्या प्रत्येक प्रवर्गातील इच्छुक आपापल्या मतदारांना भेटून तसेच सहकारी प्रवर्गातील मतदार व नेत्यांना भेटून "अभी नहीं, तो कभी नहीं" अशी चर्चा करून एक वेगळेच राजकीय गणित आखत आहेत.

प्रभागनिहाय आरक्षण सोडत झाली असून, लवकरच नागरिकांना निवडणुकीला देखील सामोरे जावे लागणार आहे. निवडणुकीसाठी अजून काही दिवस उरले असले, तरी हे दिवस निवडणूक प्रक्रियेसाठी खूपच कमी असतात. सध्या पावसाळा नुकताच सुरू झाला असून, हवेत गारवा आहे. मात्र, येथील राजकीय वातावरण मात्र चांगलेच गरम झाले आहे.

एस. सी. प्रवर्गात नाराजी

मतदार एका प्रभागात आणि आरक्षण दुसर्‍या प्रभागात जाहीर झाले असल्याने एस. सी. प्रवर्गात देखील नाराजी असल्याने त्यांचा देखील एक वेगळाच गट असल्याची चर्चा गावात सुरू आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत हळूहळू चांगलीच राजकीय उलथापालथ व राजकीय वादळे येणार असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news