पुणे: अकरावीची गुणवत्ता यादी 3 जुलैला होणार जाहीर; या आहेत महत्वाच्या तारखा

पुणे: अकरावीची गुणवत्ता यादी 3 जुलैला होणार जाहीर; या आहेत महत्वाच्या तारखा

पुणे, पुढारी वृत्तसेवा: अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेतील दुसर्‍या फेरीचे कोटा, तसेच कॅपचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार 27 ते 29 जूनदरम्यान विद्यार्थ्यांना पहिल्या भागात दुरुस्ती करण्याबरोबरच पसंतीक्रम भरता येणार आहे. 3 जुलैला प्रवेशाची गुणवत्ता यादी जाहीर होणार असून, विद्यार्थ्यांना 3 ते 5 जुलैदरम्यान प्रवेश घेता येणार असल्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने जाहीर केले आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात अकरावी प्रवेशासाठी 324 महाविद्यालयांत 88 हजार 604 कॅपच्या, तसेच 24 हजार 786 कोटा प्रवेशाच्या अशा एकूण 1 लाख 13 हजार 390 जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी पहिल्या फेरीत कोटा आणि कॅप मिळून 27 हजार 253 जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. तर, प्रवेशासाठी 86 हजार 137 जागा उपलब्ध आहेत. प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांपैकी केवळ निम्म्याच विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरीत प्रवेश घेतल्याचे उघडकीस आले आहे. आता दुसर्‍या फेरीसाठी 27 ते 29 जूनदरम्यान विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याची प्रक्रिया करता येईल.

महत्त्वाच्या तारखा

30 जून ते 2 जुलै : अर्जाच्या माहितीवर प्रक्रिया.
3 जुलै सकाळी 10 वा. : गुणवत्ता यादी जाहीर होणार.
3 ते 5 जुलै : यादीतील विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करता येणार.
5 जुलै : प्रवेशित विद्यार्थ्यांची स्थिती पोर्टलवर.
27 जून ते 5 जुलै : कोटा प्रवेशाची प्रवेश प्रक्रिया.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news