

ओतूर : पुढारी वृत्तसेवा
कल्याण-नगर महार्गावर खामुंडी गावच्या हद्दीत शुक्रवारी (दि. २७) सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास एसटी बस (एमएच २० बीएल ३५४५) ची स्कुटीला धडक बसून झालेल्या अपघातात स्कुटीवरील (एमएच १४ इएस १३६१) एकजण ठार तर एकजण गंभीर जखमी झाला.
या अपघातात सोपान सावळेराम शिंगोटे (वय ७५, रा. खामुंडी, ता. जुन्नर) यांचा मृत्यू झाला असून किसन बाळशीराम शिंगोटे (रा. खामुंडी) हे स्कुटी चालक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर आळेफाटा येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
घटनेचे गांभीर्य ओळखून ओतूरचे सहायक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सचिन डोळस आणि नामदेव बांबळे घटनास्थळी त्वरेने हजर झाले व परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. याबाबत अधिक तपास ओतूर पोलीस करीत आहेत.
हेही वाचा