

पुढारी ऑनलाईन डेस्क : तीन वर्षांपूर्वी कोरोनाचे महासंकट संपूर्ण विश्वावर आलं. कोरोना महामारीत सर्वांनी ऐकलेले वाक्य म्हणजे 'तुम्ही बाहेरुन घरी आला की किमान २० मिनिटे चांगले हात धुवा'. या महामारीमुळे हात धुण्याचे महत्त्व सर्वांनाच पटले. त्याच काळात बहुतांश ठिकाणी हँड सॅनिटायझर्स वापरण्यासही सुरुवात झाली. आता कोरोनाचे संकट संपले आहे. मात्र व्यक्तिगत स्वच्छतेमध्ये हात धुण्याचे महत्त्व आजही लोकांना पटलेले आहे. मात्र तुम्हाला माहिती आहे का, तुमचे हात निर्जंतुक करण्यासाठी वापरल्या जाणार्या अल्प प्रमाणात वापरले जाणारे अल्कोहोल-आधारित हँड सॅनिटायझर्स पुरेसे ठरत नाही, असे नवीन अभ्यास माहिती समोर आली आहे. ५ मे रोजी साजरा झालेल्या जागतिक हात स्वच्छता दिनानिमित्त नवीन अभ्यासातील निष्कर्ष अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स अँड इन्फेक्शन कंट्रोल या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला. ( Washing Hands )
बुडापेस्टच्या सेमेलवेइस विद्यापीठ आणि ओबुडा विद्यापीठाच्या संशोधकांनी हात धुण्याबाबत होणार्या चुकाबाबत संशोधन केले. त्यांनी इशारा दिला आहे की, हॉस्पिटलच्या संसर्गामुळे जगभरात हजारो लोक आपला जीव गमावतात आणि आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वे अपुरी वाटतात.
संशोधनात सहभागी झालेल्या ३४० हून अधिक वैद्यकीय विद्यार्थ्यांना १.५ किंवा ३ मिली अल्कोहोल-आधारित हँड सॅनिटायझर हात स्वच्छ करण्यासाठी देण्यात आले. हँड सॅनिटायझर प्रथम द्रव स्वरूपात, नंतर जेल-आधारित स्वरूपात देण्यात आले. यामध्ये असे आढळले की, हात पूर्णपणे स्वच्छ करण्यासाठी १.५ मिली हँड सॅनिटायझर कोणत्याही स्वरूपात (जेल किंवा द्रव) अपुरे आहे. जेलने सरासरी सात टक्के तर द्रव सॅनिटायझरने ५.८ हात निर्जंतुक झालेच नसल्याचे स्पष्ट झाले. हात तुम्ही सॅनिटायझरने स्वच्छ करा किंवा पाण्याने धुवा, यावेळी हाताच्या तळव्याबराेबरचबोटे स्वच्छ करण्याची काळजी घेणे आवश्यक आहे, असे सेमेलवेस विद्यापीठातील शस्त्रक्रिया, प्रत्यारोपण आणि गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभाग.डॉ. कॉन्स्टँटिनोस व्होनियाटिस यांनी सांगितले.
कोरोना महामारी दरम्यान हाताची स्वच्छतेचा मुद्दा चर्चेत आला. नवीन संशोधन सिद्ध करते की, स्वच्छतेमध्ये हाताच्या आकारानुसार सॅनिटायझर आणि सरासरी हात घासण्याची वेळ ४० ते ४२ सेकंद होती. हात किमान ३०-३२ सेकंद धुणे हे अधिक फायद्याचे ठरते, आता पूर्वीचे हात धुण्याबाबतचे निरीक्षणे अद्ययावत करण्याची गरज आहे. आरोग्य सेवा संस्थांमध्येच नव्हे तर स्वच्छता जागरूकता असलेल्या प्रत्येकासाठी उपयुक्त ठरेल, असेही या संशोधनात नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा :