गडचिरोली : नक्षलवाद्यांकडून माजी सरपंचाची हत्या

इसिस
इसिस
Published on: 
Updated on: 

गडचिरोली : पुढारी वृत्तसेवा; सशस्त्र नक्षलवाद्यांकडून आज, बुधवारी (दि. २० जुलै) दुपारी भामरागड तालुक्यातील मन्नेराजाराम येथील एका व्यक्तीची गळा चिरुन हत्या केली. रंगा मडावी ( वय ५०) असे मृत व्यक्तीचे नावे आहे. रंगा मडावी हे दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास मन्नेराजाराम येथून मडवेली येथे मोटारसायकलने जात असताना वाटेत नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. मडावी हे मन्नेराजाराम ग्रामपंचायतीचे दहा वर्षे सरपंच होते. त्यांच्या हत्येचे नेमकं कारण कळू शकले नाही. दामरंचा उपपोलिस ठाण्यातील पोलीस घटनेचा तपास करीत आहेत.

एप्रिल २०२२ मध्ये मन्नेराजाराम गावाजवळच्या गेर्राटोला येथील मीना सिडाम या युवतीची हत्या करुन तिचा मृतदेह एका नाल्यात पुरण्यात आला होता. या विरोधात भामरागड तालुक्यातील आदिवासींनी मोठे आंदोलन करुन तीव्र संताप व्यक्त केला होता. मीना सिडाम हिच्या खुनात सरपंच रंगा मडावी यांचा मुलगा अविनाश मडावी याचा हात असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती. या घटनेची प्रतिक्रिया म्हणून नक्षलवाद्यांनी रंगा मडावी यांची हत्या केली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे.

हेही वाचा!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news