

पुढारी ऑनलाईन डेस्क : हिमाचल प्रदेश मध्ये भूस्खलन झाले. या घटनेत ९ जणांचे मृत्यू झाला. ही घटना हिमाचल प्रदेश मधील किन्नौर जिल्ह्यातील बटबेसच्या गुंसा जवळ घडली आहे. या घटनेत एका डॉक्टर महिलेचा समावेश आहे. डॉ. दीपा शर्मा अस त्यांच नाव आहे. घटनेच्या काही वेळापूर्वी डॉ. दिपा शर्मा यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
पर्यटकांची गाडी भूस्खलनामध्ये सापडली. गाडीवर मोठ मोठे दगड कोसळले. यात ९ जणांचे मृत्यू झाला. यात एका नेव्ही अधिकाऱ्याचाही समावेश आहे. तर राजस्थान मधील तिघांनी जीव गमवला. डॉ. दीपा शर्मा यांनी २०१३ मध्ये कौन बनेगा करोडपतीमध्ये सहभाग घेतला होता. त्या लेखिका होत्या, त्यांनी पंचकर्म विषयात आपलं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं होतं. दीपा यांनी विज्ञान शाखेतून क्लिनीकल न्यूट्रीशनिस्ट आणि डाएटेटीक्स विषयात आपली पदवी पूर्ण केली होती.
डॉ.दीपा शर्मा यांनी अपघाताच्या काही तास आधी घटनास्थळाभोवती बरेच छायाचित्रण केले होते. यातील काही फोटो त्यांच्या ट्विटर अकाउंटवरही पोस्ट केले होते. मृत्यूच्या काही मिनिटांपूर्वीच त्यांनी स्वत: चा एक फोटोही ट्विट केला होता.
हिमाचल प्रदेशच्या किन्नौर जिल्ह्यात बटसेरी जवळ भूस्खलन झाले. दगड खाली कोसळत होते. यात अनेक वाहनांवर दगड कोसळले. पर्यटकांच्या वाहनावर दगड कोसळले. यात नऊ जण ठार झाले. तर तीन लोक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सीएचसी सांगला येथे उपचार सुरु आहेत.