योगी आदित्यनाथांनी घेतली ‘यूपी’च्या मुख्यमंत्रिपदाची शपथ, पंतप्रधान मोदी उपस्थित

योगी आदित्यनाथांनी घेतली ‘यूपी’च्या मुख्यमंत्रिपदाची शपथ, पंतप्रधान मोदी उपस्थित
Published on
Updated on

लखनौ : वृत्तसंस्था :  योगी आदित्यनाथ यांनी येथील अटल स्टेडियममध्ये सलग दुसर्‍यांदा उत्तर प्रदेश या देशातील सर्वात मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ शुक्रवारी घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदीही यावेळी उपस्थित होते. मंत्रिमंडळात 52 आमदारांचा समावेश करण्यात आला आहे. पैकी 50 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात 18 कॅबिनेट, 12 स्वतंत्र खात्यांचे, तर 20 राज्यमंत्री आहेत.

केशव प्रसाद मौर्य आणि ब्रुजेश पाठक हे नव्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री असतील. योगींनंतर या दोघांनी शपथ घेतली. माजी उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा, श्रीकांत शर्मा, सतीश महाना, मोहसिन रझा यांच्यासह जवळपास 20 माजी मंत्र्यांची नावे नव्या यादीत नाहीत. माजी उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांच्यासह 20 माजी मंत्र्यांना नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही. पंतप्रधान मोदी स्टेडियममध्ये दाखल झाल्यानंतर अवघ्या दोनच मिनिटांनी शपथविधी सोहळ्यास सुरुवात करण्यात आली. अनेक आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर 'भारत माता की जय' हा घोष आवर्जून केला.

शपथ घेणारे कॅबिनेट मंत्री

योगी आदित्यनाथ – मुख्यमंत्री, केशव प्रसाद मौर्य, ब्रुजेश पाठक – उपमुख्यमंत्री, सुरेश कुमार खन्‍ना (नवव्यांदा आमदार, माजी अर्थमंत्री), सूर्य प्रताप शाही (माजी प्रदेशाध्यक्ष, माजी कृषिमंत्री), स्वतंत्र देव सिंह (प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री), बेबी राणी मौर्य (उत्तराखंड, माजी राज्यपाल), लक्ष्मी नारायण चौधरी, जयवीर सिंह, धर्मपाल सिंह, नंद गोपाल नंदी, भूपेंद्र चौधरी, अनिल राजभर, जतीन प्रसाद, राकेश सचान, अरविंद कुमार शर्मा (माजी आयएएस अधिकारी), योगेंद्र उपाध्याय, आशिष पटेल (केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांचे पती, अपना दलचे प्रदेशाध्यक्ष), संजय निषाद (निषाद पक्षाचे अध्यक्ष), असिम अरुण (माजी आयपीएस), धर्मवीर प्रजापती.

स्वतंत्र खात्यांचे अन्य मंत्री

नितीन अग्रवाल, कपिलदेव अग्रवाल, संदीप सिंह लोधी, रवींद्र जायसवाल, गुलाब देवी, गिरीशचंद्र यादव, जयंत राठौड, दयाशंकर सिंह, दिनेश प्रताप सिंह, नरेश कश्यप, दयाशंकर दयाळू, अरुण कुमार सक्सेना.

राज्यमंत्र्यांची यादी

मयंकेश्‍वर सिंह, दिनेश खाटिक, संजीव कुमार गौड, बलदेव सिंह औलख, अजित पाल, जसवंत सैनी, मनोहरलाल, राकेश निषाद, संजय गंगवार, ब्रुजेश सिंह, कृष्ण पाल मलिक, अनुप प्रधान वाल्मीकी, प्रतिभा शुक्ल, राकेश राठौड, रजनी तिवारी, सतीश शर्मा, दानिश आझाद, विजय लक्ष्मी गौतम.

यादीत नाव नसलेले गत सरकारमधील मंत्री

दिनेश शर्मा, श्रीकांत शर्मा, सतीश महाना, नीळकंठ तिवारी, सिद्धार्थ नाथ सिंह, जयप्रताप सिंह पटेल, सतीश महाना, मोहसिन रजा, आशुतोष टंडन.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news