‘दै. पुढारी पुणे प्रॉपर्टी एक्स्पो’चा आज कोल्हापुरात शुभारंभ | पुढारी

‘दै. पुढारी पुणे प्रॉपर्टी एक्स्पो’चा आज कोल्हापुरात शुभारंभ

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

आपल्या मनातलं घर तेही पुण्यात घेण्याची संधी ‘दै. पुढारी पुणे प्रॉपर्टी एक्स्पो 2022’च्या माध्यमातून कोल्हापूरकरांना मिळणार आहे. दोन दिवसीय प्रॉपर्टी एक्स्पोला शनिवारी, (दि. 26) प्रारंभ होत आहे. हॉटेल पॅव्हेलियनमधील मधुसूदन हॉल येथे प्रदर्शन होणार आहे. सकाळी 10 ते रात्री 8 यावेळेत हे प्रदर्शन ग्राहकांसाठी खुले राहणार आहे.

दै. ‘पुढारी’चे चेअरमन व समूह संपादक डॉ. यागेश जाधव यांच्या अध्यक्षस्थानी व क्रेडाई कोल्हापूरचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर यांच्या हस्ते या बांधकाम प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी आयकॉन स्टीलचे प्रकाश पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

नैसर्गिक सौंदर्यासोबतच पुण्यात आधुनिक शैक्षणिक आणि औद्योगिक वाढ झपाट्याने होत आहे. शहरात अनेक ठिकाणी टोलेजंग इमारती उभारल्या आहेत. बदलत्या पुण्यामध्ये कोल्हापूरकरांचे घर घेण्याचे स्वप्न ‘दै. पुढारीच्या पुणे प्रॉपर्टी एक्स्पो’मुळे पूर्ण होणार आहे. त्यांच्या स्वप्नपूर्तीला विकसकांनीही साथ दिली. त्यामुळेच बजेट होम्स, सेकंड होम्सचे अनेकविध पर्यायही घर खरेदीदारांसाठी खुले होऊ लागले आहेत.

या प्रदर्शनात पुण्यातील नामांकित विकसकांचा यात समावेश आहे. त्यांच्या प्रकल्पांची माहिती ग्राहकांना देण्यात येणार आहे. यात बजेट होम्ससह अनेक लक्झरी प्रकल्पांचाही समावेश आहे. पुण्यातील अनेक नामांकित महत्त्वाकांक्षी गृहप्रकल्पांचा समावेश या प्रदर्शनात असणार आहे. त्यामुळे गुढीपाडव्याच्या निमित्ताने घर खरेदीची ही सुवर्णसंधी महत्त्वाची ठरणार आहे.

‘या’ विकसकांच्या स्टॉल्सचा समावेश

सुमेरू ग्रुप मगरपट्टा सिटी कॉर्पोरेशन कोलते-पाटील डेव्हलपर्स लिमिटेड स्टारगेझ प्रॉपर्टीज जयवंत ग्रुप लिमिटेड रोहन कन्स्ट्रक्शन्स ए. के. कन्स्ट्रक्शन

Back to top button