YouTube वरील ‘सिक्रेट हाऊस’ पाहून दोन मुलांनी सोडलं घर; पोलिसांनी कसा लावला शोध?

युट्यूबवर 'सिक्रेट हाऊस' खेळाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर दोन चिमुकल्यांनी घर सोडल्याची घटना उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यात घडली आहे.
YouTube Secret House Challenge
YouTube Secret House ChallengeFile Photo
Published on
Updated on

YouTube Secret House Challenge

मेरठ: युट्यूबवर 'सिक्रेट हाऊस' व्हिडिओ पाहिल्यानंतर दोन चिमुकल्यांनी घर सोडल्याची घटना उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यात घडली आहे. पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवत दोघांनाही सुरक्षित शोधून कुटुंबाच्या ताब्यात दिले. व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्यक्षात २४-तासांचे आव्हान पूर्ण करण्यासाठी त्यांनी एका फार्महाऊसजवळील निर्जन ठिकाणी लपण्यासाठी आपला तळ उभारला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

हस्तिनापूर परिसरात रविवारी दुपारी ही घटना घडली. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, ११ आणि ७ वर्षे वयाची दोन मुले अचानक घरातून गायब झाली होती. कुटुंबीयांनी परिसरात आणि नातेवाईकांकडे त्यांचा शोध घेतला; परंतु त्यांचा काहीच थांगपत्ता लागला नाही. त्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली.

YouTube Secret House Challenge
HC Hijab Row Ruling : मुस्लिम महिलांनी हिजाब परिधान करणे अनिवार्य धार्मिक प्रथा नाही : हायकोर्टाचे महत्त्‍वपूर्ण निरीक्षण

'मिशन शक्ती' अंतर्गत पोलिसांची तातडीची कारवाई

पोलिस आणि 'मिशन शक्ती'च्या पथकाने अवघ्या दोन तासांत दोन्ही मुलांना सुखरूप शोधून काढले आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. पोलिसांच्या चौकशीत मुलांनी सांगितले की, त्यांनी यूट्यूबवर 'सिक्रेट हाऊस' नावाच्या गेमचा व्हिडिओ पाहिला होता. त्या गेममधील '२४ तास लपून राहण्याचे चॅलेंज' प्रत्यक्षात करून पाहण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि त्यासाठी घर सोडले.

काय आहे '24-Hour Secret House Challenge'?

'24-Hour Secret House Challenge' हा यूट्यूबवरील सध्या लोकप्रिय होत असलेला ट्रेंड आहे. या व्हिडिओंमध्ये सहभागी व्यक्ती गुप्त ठिकाणी किंवा लपवलेल्या खोलीत स्वतःचा 'सीक्रेट बेस' तयार करतात आणि ठरावीक नियम पाळत 24 तास तिथे लपून राहतात. या प्रकारच्या व्हिडिओंचा प्रभाव लहान मुलांवर पडत असून, तेही अशाच प्रकारचे प्रयोग प्रत्यक्ष आयुष्यात करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे.

पालकांनी काय काळजी घ्यावी?

या घटनेनंतर पोलिसांनी पालकांना आपल्या मुलांच्या मोबाईल आणि यूट्यूबवरील कंटेंटवर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे. सोशल मीडियावरील चॅलेंज किंवा गेमचे अंधानुकरण करणे धोकादायक ठरू शकते, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

YouTube Secret House Challenge
Datura fruit online sale: धोतऱ्याच्या फळांमुळे ॲमेझॉन आणि स्विगी इन्स्टामार्ट अडचणीत; नेमकं काय आहे प्रकरण?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news