Datura fruit online sale: धोतऱ्याच्या फळांमुळे ॲमेझॉन आणि स्विगी इन्स्टामार्ट अडचणीत; नेमकं काय आहे प्रकरण?

'थॉर्न ॲपल' म्हणून ओळखली जाणारी ही वनस्पती अत्यंत विषारी असून, योग्य प्रक्रियेद्वारे शुद्ध न करता याचे सेवन केल्यास आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो
Datura fruit
Datura fruitFile Photo
Published on
Updated on

Datura fruit online sale

बेंगळूर: धोतऱ्याचे फळ आणि बिया अन्नपदार्थ म्हणून विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्याप्रकरणी कर्नाटकच्या अन्न सुरक्षा व औषध प्रशासन विभागाने मोठी कारवाई केली आहे. ॲमेझॉन, स्विगी इन्स्टामार्ट आणि बिगबास्केट या ई-कॉमर्स कंपन्यांचे अन्न व्यवसाय परवाने पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्याचे आदेश विभागाने दिले आहेत.

प्रशासनाने या कंपन्यांना त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून धोत्र्याची विक्री आणि जाहिराती तातडीने हटवण्याचे तसेच मानवी वापरासाठी त्याची अन्नपदार्थ म्हणून होणारी विक्री पूर्णपणे बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. 'थॉर्न ॲपल' म्हणून ओळखली जाणारी ही वनस्पती अत्यंत विषारी असून, योग्य प्रक्रियेद्वारे शुद्ध न करता याचे सेवन केल्यास आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो; तसेच यामुळे कोमात जाणे किंवा अत्यंत गंभीर प्रकरणांमध्ये मृत्यू ओढवणे असे परिणाम होऊ शकतात. त्यामुळे अशा विषारी फळांची अन्न म्हणून साठवणूक व विक्री करणे बेकायदेशीर असल्याचे विभागाने स्पष्ट केले.

Datura fruit
Flipkart, Amazon, Coca-Cola सह 150 कंपन्यांना FSSAI कडून नोटीस

मिळालेल्या तक्रारींनुसार अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी ई-कॉमर्स कंपन्यांच्या गोदामांमध्ये अचानक पाहणी केली असता, FSSAI चा अन्न परवाना किंवा नोंदणी क्रमांक वापरून धोत्रा फळे आणि बियांचे पॅकिंग विक्रीसाठी ठेवल्याचे आढळले. हे फळ साधारण १८ ते २० रुपये प्रति नग या दराने विकले जात होते. साधारणपणे पूजेसाठी किंवा पारंपरिक औषध उपचारांसाठी धोत्र्याचा वापर केला जातो; मात्र त्याची थेट अन्न म्हणून विक्री होत असल्याचे समोर आल्याने प्रशासनाने कडक पाऊल उचलले.

सोमवारी या तिन्ही कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीनंतर परवाने निलंबनाचा हा निर्णय घेण्यात आला. बैठकीत दोन कंपन्यांनी अधिक माहिती देण्यासाठी मुदत मागितली, तर एका कंपनीने 'हा पदार्थ मानवी सेवनासाठी नाही' असा स्पष्ट उल्लेख केल्याचा दावा केला. मात्र, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन विभागाने तिन्ही कंपन्यांसह या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सना धोत्रा पुरवठा करणाऱ्या मुख्य विक्रेते आणि पुरवठादारांचेही अन्न परवाने निलंबित केले आहेत.

Datura fruit
FSSAI Registration For Schools: शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या जेवणावर ‘एफएसएसएआय’ची सक्ती; पोषणयुक्त आहारासाठी प्रशासनाचे कडक नियम

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news