viral news | "मी ४१ वर्षांची झालेय, तरीही घरचे लग्न लावून देत नाहीत!" : महिलेची कुटुंबाविरुद्ध थेट पोलिसांत धाव!

marriage obstacles family harassment | सोशल मीडियावर व्‍हिडिओ प्रचंड व्‍हायरल
viral news
प्रतीकात्मक छायाचित्र.AI-generated image
Published on
Updated on

marriage obstacles family harassment

लखनौ : घरचे लोक आपले लग्न लावून देत नाहीत, अशी तक्रार घेऊन उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील तरुणीने थेट पोलीस ठाणे गाठले. या घटनेचा १६ सेकंदांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, तिने आपल्या कुटुंबावर मारहाणीचेही आरोप केले आहेत.

भाऊ आणि वहिनी जाणीवपूर्वक लग्न मोडतात

तक्रारदार तरुणीने म्हटले आहे की, "माझे वय ४१ वर्षे झाले आहे आणि मला लग्न करायचे आहे, परंतु माझे कुटुंबीय लग्नासाठी तयार नाहीत. जेव्हा जेव्हा लग्नाचे एखादे स्थळ येते, तेव्हा भाऊ त्याला नकार देतात. लग्नात पैसे खर्च करावे लागतील, या भीतीने भाऊ लग्न लावून देत नसल्याचे तिने तक्रारीत नमूद केले आहे.

viral news
Shocking Incident | "४ गर्लफ्रेंड्स आणि १२ पानांचे 'ते' पत्र.." : सॉफ्टवेअर इंजिनिअरच्‍या भावी पत्‍नीने जीवन का संपवले ?

पोलीसात तक्रार दाखल

तरुणीने सांगितले की, तिच्या भावाने कुटुंबाची जमीन स्वतःच्या नावावर करून घेतली आहे, तरीही तो लग्नाच्या खर्च करण्‍यास नकार देत आहे. . तक्रारदार महिला सराय इनायत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मनापूर गावात राहते. तिने आपल्या तक्रारीत वडील, आई आणि बहिणीचाही समावेश केला आहे.

viral news
Sambhajinagar Death Case Update: 2009 पासूनचे संबंध, 36 लाखांची वसुली... एकत्र राहण्याचा अट्टाहास; पत्नीचा गेला नाहक बळी

मानसिक छळ आणि मारहाणीचा आरोप

माधुरीने तक्रारीत म्हटले आहे की, ती गेल्या २० वर्षांपासून घरात एकाकी जीवन जगत आहे. कौटुंबिक कारणांमुळे तिच्या आई-वडिलांनी तिला वेगळे केले आहे. वडील रामराज पटेल, आई बिमला देवी, भाऊ राजेंद्र, वहिनी पूनम आणि बहीण विद्या हे सर्वजण आपल्याला शिवीगाळ करतात, असा तिचा आरोप आहे. तसेच तिचा मानसिक छळ केला जातो आणि तिला मारहाणही केली जाते.

viral news
Crime News: पत्नीला १२० पुरुषांना विकले! ऑनलाईन जाहिराती देऊन शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले

पोलिसांकडे लावला लग्नाचा तगादा

माधुरीने पोलिसांकडे विनवणी केली आहे की, तिचे लग्न एखाद्या चांगल्या मुलाशी लावून द्यावे, जेणेकरून ती सन्मानाने जगू शकेल. कुटुंब आर्थिक मदत करत नाही आणि जेवणही देत नाही. ती स्वतः छोटी-मोठी कामे करून आपला उदरनिर्वाह करते. एके दिवशी या सर्वांनी तिच्या खोलीत घुसून तिला मारहाण केल्याचेही तिने तक्रारीत म्‍हटलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news