Shocking Incident | "४ गर्लफ्रेंड्स आणि १२ पानांचे 'ते' पत्र.." : सॉफ्टवेअर इंजिनिअरच्‍या भावी पत्‍नीने जीवन का संपवले ?

तरुणाच्‍या बेदरकार वर्तनामुळे तरुणी गेल्या काही दिवसांपासून होती नैराश्यात
Shocking Incident
आंध्र प्रदेशातील कडप्पा जिल्ह्यात २६ वर्षीय रेहानाने राहत्या घरी जीवन संपविण्‍याची धक्कादायक घटना घडली आहे. भावी पतीने लग्नासाठी नकार देत मानसिक छळ केल्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप केला जात आहे.
Published on
Updated on

software engineer harassment case

विजयवाडा : आंध्र प्रदेशातील कडप्पा जिल्ह्यात एका २६ वर्षीय तरुणीने राहत्या घरी जीवन संपविण्‍याची धक्कादायक घटना घडली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला साखरपुडा झाल्यानंतर, होणाऱ्या पतीने लग्नासाठी नकार देत मानसिक छळ केल्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप केला जात आहे.

ऑगस्‍टमध्‍ये होणार होते लग्‍न

चिन्ना चौक पोलीस ठाण्‍याच्‍या कर्मचार्‍यांनी दिलेल्‍या माहितीनुसार, रेहाना (वय २६) हिने अलीकडेच तिचे एम.एस्सी.चे शिक्षण पूर्ण केले होते. १५ फेब्रुवारी रोजी तिचा साखरपुडा कडप्पा जिल्ह्यातील प्रोद्दुटूर येथील रहिवासी आणि बंगळुरूमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या शाहजहान याच्याशी झाला होता. या वर्षी ऑगस्ट महिन्यात त्यांचे लग्न होणार होते. सुरुवातीला या दोघांमध्ये सर्व काही सुरळीत होते. दोघेही रात्री उशिरापर्यंत फोनवर संवाद साधायचे. मात्र, पोलिसांच्या म्हणण्यानुसार, गेल्या तीन आठवड्यांपासून शाहजहानच्या वर्तनात अचानक बदल झाला.

Shocking Incident
shocking crime news | पोटच्या जुळ्या मुलींचा गळा चिरला आणि थेट फोन केला...नराधम बापाच्या 'त्या' कॉलने पोलीसही हादरले!

४ प्रेयसी आणि १२ पानांचे ते पत्र

रेहानाने जीवन संपविण्‍यापूर्वी १२ पानांची सविस्तर पत्रच लिहून ठेवली आहे. यामध्ये तिने शाहजहानच्या बदललेल्या वागणुकीचे वर्णन केले आहे. तिने पत्रात नमूद केले की, शाहजहान तिला वारंवार सांगू लागला होता की, माझ्या मनात तुझ्याबद्दल कोणत्याही भावना उरल्या नाहीत. मी तुझा पूर्णपणे तिरस्कार करतो." इतकेच नव्हे तर, त्याचे यापूर्वी चार महिलांशी प्रेमसंबंध होते, अशी कबुलीही त्याने तिला दिली होती.या सर्व प्रकारामुळे रेहाना गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात होती. बुधवारी कडप्पा येथील पटेल स्ट्रीटवरील तिच्या निवासस्थानी ती मृतावस्थेत आढळली.

Shocking Incident
crime news | कौर्याचा कडेलोट..! मुलाच्या हव्यासापोटी नराधम बापाने केली जुळ्या मुलींची निर्घृण हत्या

रेहानाच्‍या कुटुंबीयांचे गंभीर आरोप

रेहानाच्या कुटुंबीयांनी शाहजहानवर गंभीर आरोप केले आहेत. "त्याने आमच्या मुलीला सांगितले की त्याला दारूचे व्यसन आहे. त्याच्या अनेक प्रेयसी आहेत. वडिलांच्या दबावाखाली मी हे लग्न करत आहे, असे सांगून त्याने रेहानालाच लग्न मोडण्यासाठी दबाव टाकायला सुरुवात केली. जेव्हा तिने त्याला जाब विचारला, तेव्हा त्याने स्पष्टपणे सांगितले की त्याला ती अजिबात आवडत नाही," असे रेहानाच्‍या आईवडिलांनी सांगितले. शाहजहानच्या या वागणुकीमुळे आमची मुलगी नैराश्यात गेली आणि तिने आत्महत्या केली. तिने १२ पानांच्या पत्रात आपला सर्व छळ लिहून ठेवला आहे. आमच्या मुलीच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या शाहजहानला कडक शासन व्हावे," अशी आर्त साद तिच्या पालकांनी पोलिसांना घातली आहे.

Shocking Incident
Bengaluru News: AI मुळे नोकरी गेल्याने इंजिनिअरने जीवन संपवले; पतीचा मृतदेह पाहून पत्नीनेही १८ व्या मजल्यावरून उडी मारली

आरोपीसह त्‍याच्‍या आई-वडिलांनाही अटक

रेहानाच्या वडिलांच्या तक्रारीवरून चिन्ना चौक पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी शाहजहान आणि त्याच्या आई-वडिलांना (एम. वीरिया आणि एम. वहीदा) जीवन संपविण्‍यास प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. आरोपींना स्थानिक न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news