Viral Video: शिक्षकाने विद्यार्थ्याच्या डोक्यावर 'तबला' वाजवत बनवला व्हिडिओ; शिक्षण विभागाची कारवाई

एका प्राथमिक शाळेतील शिक्षकाला वर्गात एका मुलाच्या डोक्यावर 'तबला वाजवल्यासारखे' कृत्य करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर निलंबित करण्यात आले आहे.
viral video teacher
viral video teacherFile Photo
Published on: 
Updated on: 

Viral Video

इटावा: उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यातून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका प्राथमिक शाळेतील शिक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. वर्गात एका मुलाच्या डोक्यावर 'तबला वाजवल्यासारखे' कृत्य करतानाचा त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

दिनेश कुमार माथूर असे या निलंबित शिक्षकाचे नाव आहे. विशेष म्हणजे, या शिक्षकानेच हे कृत्य स्वतःच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून नंतर आपल्या फेसबुक अकाऊंटवर अपलोड केले होते.

viral video teacher
Viral Video Woman throws dog in river: माणुसकीचा अंतच झाला? महिलेने थेट पुलावरून कुत्र्याला नदीत फेकले; क्रूर VIDEO व्हायरल

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये माथूर खुर्चीवर बसलेले दिसत आहेत, तर त्यांच्या समोर जमिनीवर एक मुलगा बसलेला आहे. माथूर अत्यंत विकृत आनंदात विद्यार्थ्याच्या डोक्यावर तबला वाजवल्यासारखी वारंवार थाप मारत असल्याचे आणि मोठ्याने हसत असल्याचे या व्हिडिओत स्पष्टपणे दिसून येत आहे. यावेळी आजूबाजूला बसलेली इतर मुलेही त्यात सामील झाली होती.

शिक्षण विभागाची कठोर कारवाई

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तो इटावाच्या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत शिक्षण अधिकारी डॉ. राजेश कुमार यांनी दिनेश कुमार माथूर याच्या वर्तणुकीला शिस्तभंग मानून तत्काळ प्रभावाने निलंबित केले.

सध्या शिक्षण विभागाकडून या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी केली जात असून, चौकशीच्या अहवालात समोर येणाऱ्या निष्कर्षांनुसार या शिक्षकावर आणखी कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.

viral video teacher
viral video : 'तब्बीयतसे पत्थर तो फेको...'; अंगावर साडी, अनवाणी पाय! मुलांच्या भविष्यासाठी २७ वर्षांची आई १६०० मीटर धावली!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news