Viral Video Woman throws dog in river: माणुसकीचा अंतच झाला? महिलेने थेट पुलावरून कुत्र्याला नदीत फेकले; क्रूर VIDEO व्हायरल

Nepal woman throws dog from bridge : नेपाळमध्ये एका महिलेने कुत्र्याला पुलावरून नदीत फेकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
Viral Video Woman throws dog in river
Viral Video Woman throws dog in riverFile Photo
Published on
Updated on

Viral Video Woman throws dog in river

काठमांडू : नेपाळमध्ये एका महिलेने निष्पाप कुत्र्याला पुलावरून नदीत फेकल्याचा क्रूर व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करत संबंधित महिलेवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. व्हिडीओ पोलिसांना मिळाल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.

व्हिडिओमध्ये काय?

नेपाळमधील बझांग जिल्ह्यातील चैनपूर येथून व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये लाल रंगाचा कुर्ता-सलवार परिधान केलेली एक महिला नदीच्या पुलावर कुत्र्याला दोन्ही हातांनी पकडून उभी असल्याचे दिसते. कुत्रा महिलेच्या तावडीतून सुटून पळण्याचा प्रयत्न करतो; मात्र महिला त्याला पुन्हा पकडते. त्यानंतर ती कुत्र्याला पुलावरून थेट खाली सेती नदीच्या वेगवान प्रवाहात फेकून देताना दिसत आहे.

Viral Video Woman throws dog in river
Accident viral video: नशीब म्हणजे काय, हे हा व्हिडिओ पाहिल्यावर समजेल! दुचाकीस्वाराला वाचवताना बस पेट्रोल पंपात घुसली

व्हिडिओमध्ये कुत्रा नदीत पडल्यानंतर पाण्यात वाहून जाताना स्पष्टपणे दिसत आहे. हा संपूर्ण प्रकार तिथून जाणाऱ्या अन्य एका व्यक्तीने आपल्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, हा व्हिडिओ नेमका कधी शूट करण्यात आला आणि कुत्र्याची त्यानंतर काय अवस्था झाली, याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

या घटनेची माहिती मिळताच बझांग पोलिसांचे एक पथक घटनास्थळी (पुलावर) पोहोचले आणि त्यांनी परिसरात शोध घेतला, मात्र कुत्र्याबाबत कोणताही मागमूस लागला नाही. पोलिसांनी संबंधित महिलेची ओळख पटवण्यासाठी तपास सुरू केला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, नेपाळमध्ये प्राण्यांवरील क्रूरतेविरुद्ध कायदे अस्तित्वात आहेत आणि ते सध्या या प्रकरणाशी संबंधित पुरावे गोळा करत आहेत.

महिलेवर कारवाईची मागणी

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी महिलेविरोधात संताप व्यक्त केला. अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी पोलिसांकडे महिलेची ओळख पटवून तिला अटक करण्याची तसेच तिच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.

Viral Video Woman throws dog in river
Mumbai Local Viral Video: रीलसाठी केला जीवघेणा स्टंट? मुंबई लोकलच्या दिशेने फेकला दगड, नंतर हात जोडून मागितली माफी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news