Viral News: थरकाप उडवणारी घटना! शाळेत खेळता खेळता वाद झाला अन् मित्रांनी पाचवीच्या विद्यार्थ्याचे डोळे फोडले

शाळेच्या मैदानात खेळताना झालेल्या वादातून पाचवीच्या एका विद्यार्थ्याला त्याच्याच मित्रांनी अमानुष मारहाण केली.
Viral News
Viral Newsfile photo
Published on
Updated on

Viral News

लखनऊ: शाळेच्या मैदानात खेळताना झालेल्या वादातून पाचवीच्या एका विद्यार्थ्याला त्याच्याच मित्रांनी अमानुष मारहाण केली. मारहााणीत चेहरा आणि डोळे बुटाच्या टाचेने रगडल्यामुळे या चिमुरड्याची दृष्टी गेली आहे. ही खळबळजनक घटना लखनऊमध्ये घडली आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे.

Viral News
Viral News: मंदिराबाहेरून १६ हजारांचे बूट चोरले, दारूसाठी फक्त ५० रुपयांना विकले! पोलिसांनी पुढे काय केले?

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २१ जानेवारी रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास शाळेच्या मैदानात घडली. पीडित मुलगा पाचवीत शिकतो. त्याच शाळेतील पाचवीच्या दुसऱ्या तुकडीतील एक आणि तिसरीतील एका विद्यार्थ्याने मिळून त्याला जमिनीवर पाडले. त्यानंतर या मुलांनी रागाच्या भरात आपल्या बुटाच्या टाचेने पीडित मुलाचे डोळे आणि चेहरा जोरात रगडला. या हल्ल्यात विद्यार्थ्याच्या डोळ्यांच्या बाहुल्यांना गंभीर इजा झाली असून, त्याला दिसायचे पूर्णपणे बंद झाले आहे.

रुग्णालयात उपचार सुरू

मुलाची प्रकृती बिघडल्याचे लक्षात येताच पालकांनी त्याला तातडीने लखनौ येथील कमांड हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सध्या तिथे त्याच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत, मात्र त्याची दृष्टी परत येण्याबाबत अद्याप साशंकता वर्तवण्यात येत आहे.

शाळेच्या हलगर्जीपणावर संताप

पीडित मुलाच्या आईने शाळा प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. "घटनेची माहिती दिल्यानंतरही शाळेने कोणतीही ठोस कारवाई केली नाही. जर शाळेच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच लक्ष दिले असते, तर माझ्या मुलावर ही वेळ आली नसती," असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी त्यांनी पोलीसात तक्रार नोंदवली आहे.

आरोपी दोन्ही मुले अल्पवयीन असल्याने त्यांच्यावर 'बाल न्याय कायद्या' अंतर्गत कारवाई केली जात आहे. पोलीस उपायुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत शाळेच्या व्यवस्थापनाची काय भूमिका होती आणि सुरक्षेत कुठे उणीव राहिली, याची सखोल चौकशी केली जात आहे. तपासात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

Viral News
Viral News: लग्नाच्या पहिल्या रात्री वधूची अशी मागणी.., सुहागरात सोडून नवरदेव पळून गेला; नेमकं काय घडलं?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news