Cockroach Janata Party | 'कॉकरोच जनता पार्टी'च्या वादावर अखेर RSS बोलले! म्हणाले, "काळजी करण्याचे..."

RSS reaction on Cockroach Janata Party : आपण एक जागरूक समाज असून लोकशाही प्रक्रियेचे पालन करतो
RSS reaction on Cockroach Janata Party
आरएसएसचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) वर आपले मत व्‍यक्‍त केले आहे. Pudhari
Published on
Updated on

RSS reaction on Cockroach Janata Party

नवी दिल्‍ली : सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालणाऱ्या 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) या उपरोधात्मक (Satirical) ग्रुपवरून सुरू असलेल्या वादावर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) प्रतिक्रिया समोर आली आहे. आरएसएसचे ज्येष्ठ नेते सुनील आंबेकर यांनी यावर आपले मत व्यक्त केले आहे.

'झेन झी' मध्ये 'कॉकरोच जनता पार्टी'ची प्रचंड क्रेझ

सोशल मीडियावर 'झेन झी' मध्ये 'सीजेपी'ची प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. इन्स्टाग्रामवर या ग्रुपच्या फॉलोअर्सची संख्या भारतीय जनता पार्टी (BJP) सह अनेक प्रमुख राजकीय पक्षांपेक्षाही पुढे गेली आहे. याबाबत आरएसएसचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी वृत्तसंस्‍था 'एएनआय' (ANI)शी बोलताना आपलं मत व्‍यक्‍त केले.

RSS reaction on Cockroach Janata Party
'Cockroach Janata Party' चे X खाते 'ब्लॉक'च राहणार; हायकोर्टाचा अभिजीत दिपकेंना दिलासा नाही

लोकशाहीत चर्चा होणे स्वाभाविक प्रक्रिया: सुनील आंबेकर

आंबेकर म्‍हणाले की, "एका लोकशाही समाजात वेगवेगळी मते आणि सार्वजनिक चर्चा होणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यामुळे याकडे काळजी किंवा धक्का म्हणून पाहिले जाऊ नये. 0भारतीय लोकशाहीत सर्व प्रकारचे आवाज आणि भावना सामावून घेण्याची पूर्ण क्षमता आहे. आपण एक जागरूक समाज आहोत आणि लोकशाही प्रक्रियेचे पालन करतो. आपल्याकडे पारदर्शक निवडणुका, स्वतंत्र माध्यम आणि आता सोशल मीडिया देखील आहे, जिथे दररोज मुक्त चर्चा होते. त्यामुळे लोकशाहीत कोणत्याही प्रकारची चर्चा किंवा वेगळे मत व्यक्त केल्यास आश्चर्य वाटायला नको. याकडे एका सामान्य प्रक्रियेचा भाग म्हणून पाहिले पाहिजे."दरम्यान, सरकारने 'सीजेपी'चे एक्स (ट्विटर) हँडल ब्लॉक केले असून, हे प्रकरण सध्या दिल्ली उच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

RSS reaction on Cockroach Janata Party
Cockroach Janata Party: अनुराग कश्यप, कोंकणा सेन ते उर्फी जावेद... ‘कॉकरोच जनता पार्टी'ला कोणत्या सेलिब्रिटींचा सपोर्ट?

तरुणांचा देशावर पूर्ण विश्वास

"अशा मुद्द्यांमध्ये आरएसएसने हस्तक्षेप करावा का?" या प्रश्‍नावर बोलताना आंबेकर म्‍हणाले की, "आपल्या लोकशाही संस्था, राजकीय पक्ष आणि माध्यमे या प्रकरणा हाताळण्यास पूर्णपणे सक्षम आहेत. राजकीय पक्ष सक्षम आहेत. आपली कोणतीही संस्था कमकुवत नाही. आपल्या व्यवस्थेत या गोष्टी हाताळण्याची ताकद आहे, त्यामुळे संघाने अशा प्रकरणांमध्ये लगेच उडी घेण्याची गरज आहे असे मला वाटत नाही. देशातील तरुणांच्या मनात खूप मोठ्या आशा आहेत आणि त्यांचा भारतावर पूर्ण विश्वास आहे. आरएसएसचाही देशाच्या युवा शक्तीवर पूर्ण भरवसा आहे."

RSS reaction on Cockroach Janata Party
Cockroach Janata Party: 'कॉकरोच जनता पार्टी' हे नाव ट्रेडमार्क म्हणून मिळवण्यासाठी दोन अर्ज दाखल

CJP ला मिळतोय मोठा पाठिंबा

सोशल मीडियावरील या अनोख्या ट्रेंडवर राजकीय आणि मनोरंजन विश्वातूनही प्रतिक्रिया उमटत आहेत. महुआ मोइत्रा, कीर्ती आझाद आणि अखिलेश यादव यांच्यासह विरोधी पक्षातील अनेक बड्या नेत्यांनी 'कॉकरोच जनता पार्टी'ला (CJP) पाठिंबा दिला आहे. याशिवाय, बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटी आणि स्टँड-अप कॉमेडियन्सनीही उघडपणे या ग्रुपची बाजू घेतली आहे.

RSS reaction on Cockroach Janata Party
Abhijeet Dipke: वडील MIDC तील सेवानिवृत्त अभियंता, cockroach janata party च्या अभिजीतच्या गावातील लोकांना काय वाटते?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news