Abhijeet Dipke: वडील MIDC तील सेवानिवृत्त अभियंता, cockroach janata party च्या अभिजीतच्या गावातील लोकांना काय वाटते?

Abhijeet Dipke
Abhijeet Dipkepudhari
Published on
Updated on

हिंगोली : Cockroach Janata Party चे संस्थापक अभिजीत भगवान दिपके हे सध्या सोशल मिडीयावर प्रचंड चर्चेत आले आहेत. ते हिंगोली तालुक्यातील संतूक पिंपरी येथील रहिवाशी असल्याने गावातील रहिवाशांनी गुरूवारी अभिजीत दिपके यांच्या कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा देत अभिजीतचे कौतुक केले. आमच्या गावाचे नाव संपूर्ण देशासह जगात केल्याबद्दल ग्रामस्थ आनंदून गेल्याचे दिसून आले.

Abhijeet Dipke
Cockroach Janata Party: ‘कॉकरोच जनता पार्टी’चं X अकाउंट भारतात ब्लॉक; इन्स्टाग्रामवर BJPला मागे टाकल्यानंतर मोठी कारवाई?

कुठून सुरूवात झाली?

काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सुर्यकांत यांनी बनावट पदव्या वापरून नोकऱ्या मिळविणाऱ्या प्रवृत्तींवर भाष्य करताना झुरळ या शब्दाचा उल्लेख केला होता. परंतू, सोशल मिडीयावरील तरूणांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या होत्या. अभिजीत दिपके यांनी याच विधानाचा आधार घेत कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना केली आणि तरूणांना एकत्र येण्यासाठी एक गुगल फॉर्म शेअर केला.

Abhijeet Dipke
who is Founder Of CJP: 'गंमत मधी' काढलेल्या 'कॉकरोच जनता पार्टी' चे आहे छत्रपती संभाजी नगर कनेक्शन; कोण आहे अभिजीत दीपके?

आळशी बेरोजगारांचा पक्ष

अभिजीत यांनी या पक्षाला आळशी आणि बेरोजगारांचा आवाज असे संबोधून पक्षात सामील होण्याचे आवाहन केले. मागील पाच दिवसात त्यांच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला. इन्स्टाग्रामवर 1 कोटीहुन अधिक फॉलवर्स झाले आहेत. भाजप सोशल मिडीयाच्या हॅन्डलला देखील त्यांनी मागे टाकले. अभिजीत यांनी पक्षाची वेबसाईट तयार करून त्यासाठी एक गाणे देखील लिहीले आहे. आळशी आणि बेरोजगार तरूणांचा आवाज म्हणून त्यांच्या या कॉक्रोच जनता पार्टीची ओळख निर्माण झाली आहे. केवळ चेष्टा म्हणून सुरू झालेल्या या मोहिमेला तरूणांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.

Abhijeet Dipke
Cockroach Janta Party: ‘कॉकरोच जनता पार्टी’ काय आहे? 72 तासांत 70 हजार सदस्य; सोशल मीडियावर चर्चा, महुआ मोईत्रांचा समावेश

अभिजीत मूळचा हिंगोलीचा

अभिजीत भगवान दिपके यांचे मुळ गाव हे हिंगोली तालुक्यातील संतूक पिंपरी असून त्यांचे वडील भगवान दिपके हे छत्रपती संभाजीनगर येथील एमआयडीसीत इंजिअनिअर म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत तर अभिजीत दिपके यांचे चुलते विलास दिपके हे संतुक पिंपरी येथे राहतात. अभिजीतचे घर देखील अजूनही संतुक पिंपरी येथे असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. अभिजीतच्या या कॉकरोज जनता पार्टीला प्रतिसाद पाहून संतुक पिंपरी येथील ग्रामस्थांनी गुरूवारी एकत्र येेऊन त्यांच्या पक्षाला पाठिंबा दिला.

Abhijeet Dipke
BJP electoral growth | शत प्रतिशतकडे भाजपची झेप

अभिजीत दिपके यांनी तरूणांच्या आवाजाला एक व्यासपीठ निर्माण करून दिलं. सुशिक्षीत बेरोजगारांच्या हाताला काम नाही. सामान्य माणूस हतबल झाला आहे. सामान्य माणसाचा आवाज बनून अभिजीतने काम सुरू केले आहे. आम्हाला त्याचा अभिमान असून आम्ही सर्व ग्रामस्थ त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत असे सरपंच विजय पुरी यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news