Cockroach Janata Party: अनुराग कश्यप, कोंकणा सेन ते उर्फी जावेद... ‘कॉकरोच जनता पार्टी'ला कोणत्या सेलिब्रिटींचा सपोर्ट?

Cockroach Janata Party Celebrities: ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) ही व्यंगात्मक डिजिटल मोहीम सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली असून अनेक सेलिब्रिटी तिच्याशी जोडले आहेत.
Cockroach Janata Party
Cockroach Janata PartyPudhari
Published on
Updated on

Cockroach Janata Party Celebrities: सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत असलेली ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) आता फक्त मीम्सपुरती मर्यादित राहिलेली नाही. तरुणांमध्ये लोकप्रिय ठरलेल्या या मोहिमेला आता बॉलिवूड आणि सोशल मीडिया सेलिब्रिटींचाही प्रतिसाद मिळू लागला आहे.

नेमकी काय आहे ‘कॉकरोच जनता पार्टी’?

‘कॉकरोच जनता पार्टी’ची सुरुवात सोशल मीडियावर व्यंगात्मक पद्धतीने झाली. बेरोजगारी, पेपरफुटी, भ्रष्टाचार आणि राजकीय गोंधळ यांसारख्या मुद्द्यांवर तरुणांमधील नाराजी मीम्स आणि विनोदी पोस्ट्सच्या माध्यमातून व्यक्त करण्यासाठी हा ट्रेंड पुढे आला.

पारंपरिक राजकीय पक्षांसारखी रचना नसून, ही एक इंटरनेट-आधारित व्यंगात्मक डिजिटल चळवळ मानली जात आहे. काही दिवसांतच Instagram, X आणि Reels वर हा ट्रेंड मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

कोणते सेलिब्रिटी चर्चेत?

या ट्रेंडमध्ये अनेक प्रसिद्ध चेहरे जोडले गेल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. दिग्दर्शक अनुराग कश्यप, अभिनेत्री ईशा गुप्ता, कोंकणा सेन शर्मा, फातिमा सना शेख यांसारख्या बॉलिवूड कलाकारांची नावं चर्चेत आहेत.

तसंच सोशल मीडिया आणि टीव्ही क्षेत्रातील उर्फी जावेद, उमर रियाझ, अभिषेक निगम, नग्मा मिराजकर, पुरव झा आणि गायिका हिमांशी खुराना यांनीही या पार्टीला सपोर्ट केला आहे.

Cockroach Janata Party
Cockroach Janata PartyPudhari
Cockroach Janata Party
4 Day Work Week: आठवड्यात फक्त 4 दिवस ऑफिस? कर्मचाऱ्यांना सलग 3 दिवस सुट्टी मिळणार; फक्त ही अट पाळावी लागणार

‘CJP’ मागचा चेहरा कोण?

या मोहिमेची सुरुवात अभिजीत दिपके यांनी केली आहे. ते राजकीय संवाद आणि डिजिटल मोहिमांमध्ये काम करणारे रणनीतीकार म्हणून ओळखले जातात. तरुणांच्या असंतोषाला व्यंगात्मक आणि डिजिटल भाषेत मांडण्याचा हा प्रयत्न असल्याचं मानलं जात आहे.

Cockroach Janata Party
Cockroach Janata PartyPudhari
Cockroach Janata Party
PM Kisan Update: PM किसान योजनेचा 23वा हप्ता कधी येणार? शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होण्याबाबत महत्त्वाची अपडेट
Cockroach Janata Party
Cockroach Janata PartyPudhari

एवढी लोकप्रिय का झाली?

‘कॉकरोच जनता पार्टी’च्या लोकप्रियतेमागे तिची मीम-फ्रेंडली शैली हे मोठं कारण मानलं जात आहे. गंभीर राजकीय भाषणांपेक्षा विनोद, टोलेबाजी आणि रिलेटेबल कंटेंटच्या माध्यमातून तरुणांचा रोष व्यक्त केला जात असल्याने ही मोहीम वेगाने पसरली. सध्या ही चळवळ फक्त इंटरनेट ट्रेंड राहते की पुढे आणखी मोठं रूप घेते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news