RG Kar rape-murder case updates
कोलकाता : आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल बलात्कार आणि खून पीडितेच्या वडिलांनी मंगळवारी (दि.२९) केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) बद्दल तीव्र निराशा 'ANI'शी आज (दि.२९) बोलताना व्यक्त केली आहे. एजन्सीच्या अहवालांमध्ये विसंगती असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील ३१ वर्षीय प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला होता. एएनआयशी बोलताना पीडितेचे वडील म्हणाले, "सीबीआयने कलकत्ता उच्च न्यायालय आणि सियालदाह जिल्हा न्यायालयात दोन पूर्णपणे भिन्न अहवाल सादर केले आहेत. आम्ही आज (दि.२९) उच्च न्यायालयात हे सांगू की, दोन भिन्न स्थिती अहवाल सादर केले जात आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनाही त्यांना सादर केलेल्या अहवालाच्या गांभीर्यावर विश्वास बसत नव्हता. आमचा सीबीआयवर विश्वास होता, परंतु आता आम्ही सर्व आशा गमावत आहोत."
त्यांनी पुढे असा दावा केला की, "सीबीआय माझ्या मुलीच्या बलात्कार आणि हत्येमागील गुन्हेगारांना ओळखते परंतु ते तपशील उघड करत नाही...." त्यामुळे एजन्सीवरील त्यांचा विश्वास उडाला आहे, असेही पीडीतेच्या वडीलांनी म्हटले आहे. त्यांनी चिंता देखील व्यक्त केली आहे की, त्यांच्या मुलीच्या फोनवर अनधिकृत प्रवेश झाला असावा. त्याच्या मुलीच्या एका मित्राने तिच्या मित्रांच्या गटातून बाहेर पडत संकेत दिला आहे की, तिच्या फोनमध्ये सर्व संबंधित माहिती आहे.
"माझ्या मुलीच्या मैत्रिणी दोन दिवसांपूर्वी मला भेटायला आल्या आणि त्यांनी दाखवले की, कोणीतरी त्यांच्या कॉमन व्हॉट्सअॅप ग्रुपमधून बाहेर पडण्यासाठी तिचा फोन वापरला आहे. सीबीआयकडे तिचा फोन आहे, पण ते तो नाकारतात. तिच्या मोबाईल फोनवर सर्व उत्तरे आहेत. तरी देखील अहवालात विसंगती आहे त्यामुळे मला आता भारतीय कायदेशीर व्यवस्थेत कोणावरही विश्वास नाही...," तो म्हणाला.
आरजी कर मेडिकल कॉलेज बलात्कार आणि हत्येची घटना ९ ऑगस्ट २०२४ रोजी घडली. जेव्हा ३१ वर्षीय महिला पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टर कॅम्पसमधील एका सेमिनार रूममध्ये मृतावस्थेत आढळली. या प्रकरणामुळे देशभरात व्यापक निदर्शने आणि संताप निर्माण झाला, अनेकांनी पीडितेला न्याय देण्याची मागणी केली. कोलकाता उच्च न्यायालयाने पोलिसांच्या या प्रकरणाच्या हाताळणीवर असमाधान व्यक्त केल्यानंतर या घटनेचा तपास केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) कडे वर्ग करण्यात आला. त्यानंतर सीबीआयने मुख्य आरोपी संजय रॉयसह अनेकांना अटक केली आहे, ज्याला या गुन्ह्यात दोषी ठरवण्यात आले आहे. आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये झालेल्या एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात स्वतःहून सुनावणी सुरू होती. पीडितांच्या पालकांचे प्रतिनिधित्व ज्येष्ठ वकील करुणा नंदी यांनी केले.