कोलकाता बलात्‍कार-हत्‍या प्रकरणी सीबीआयचा मोठा दावा, "आरोपी संजय राॅयने..."

RG Kar Case : मुख्‍य आरोपी संजय रॉयविरुद्ध आरोपपत्र दाखल
RG Kar Medical College rape and murder case
आरजी कार मेडिकल कॉलेज-हॉस्‍पिटलमधील महिला डॉक्‍टर बलात्‍कार आणि हत्‍या प्रकरणातील आराेपी संजय रॉय.File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : देशभरात खळबळ माजविणारे कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज-हॉस्‍पिटलमधील महिला डॉक्‍टर बलात्‍कार आणि हत्‍या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आरोपपत्र दाखल केले आहे.

आरोपीने एकट्यानेच गुन्‍हा केला...

सीबीआयने दाखल केलेल्‍या आरोपपत्रात म्‍हटले आहे की, "आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्‍पिटमध्‍ये पोलिसांसोबत नागरी स्वयंसेवक म्हणून काम करणाऱ्या संजय रॉय याने ९ ऑगस्‍ट २०२४ रोजी हा गुन्‍हा केला. पीडिता रुग्णालयाच्या सेमिनार रूममध्ये विश्रांती घेत असताना ही घटना घडली. हा गुन्‍हा एकट्या आरोपीनेच केला आहे."

पॉलीग्राफ चाचणीत आरोपीने घेतला यू-टर्न

पीडितेच्‍या मृतदेहाजवळ सापडलेल्या ब्लूटूथ उपकरणामुळे संजय रॉयला १० ऑगस्‍ट रोजी अटक करण्यात आली. त्‍याने पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिली. मात्र, त्याने पॉलीग्राफ चाचणी दरम्यान यू-टर्न घेतला. आपल्‍याला फसवले जात आहे. मी निर्दोष आहे, असा दावा त्‍याने केला होता. संजय रॉय हा कोलकाता पोलिसांच्‍या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा निकटवर्ती होता. कोलकाता उच्च न्यायालयाने १३ ऑगस्ट रोजी आदेश दिला. कोलकाता पोलिसांकडून तपास सीबीआयकडे हस्तांतरित करणे.

सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून घेतली हाेती दखल

कोलकातामधील सरकारी आरजी कार मेडिकल कॉलेजच्‍या सेमिनार विभागात ९ ऑगस्‍ट २०२४ रोजी पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी ३१ वर्षीय महिला डॉक्‍टरचा रक्तबंबाळ अवस्थेतील अर्धनग्न मृतदेह आढळून आला होता. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली. सर्वच राज्‍यांमध्‍ये निदर्शने झाली, देशभरातील डॉक्टरांनी या प्रकरणी कठोर कारवाईबरोबरच डॉक्‍टरांच्‍या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजनांची मागणी केली. डॉक्‍टर आक्रमक झाल्‍यानंतर कॉलेजचे प्राचार्य संदीप घोष यांनी प्राचार्यपदाचा राजीनामा दिला. कोलकाता उच्‍च न्‍यायालयाच्‍या आदेशानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयने हाती घेतला आहे. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल (suo motu) घेतली होती. तसेच तपास अहवाल सादर करण्‍याचे निर्देश सीबीआयला दिले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news