Rented Grandchild Startups: आजोबा-आजींना आता रेंटवर मिळणार नातू... कुठं परदेशात नाही तर भारतात सुरू झालेत स्टार्टअप्स

आजी आजोबांचे एकटेपण दूर करण्यासाठी भारतीय बाजारात एक नवीन बिजनेस मॉडेल वेगानं पसरत आहे.
Rented Grandchild Startups
Rented Grandchild Startupspudhari
Published on: 
Updated on: 

Rented Grandchild Startups: भारत हा कौटुंबीक नात्यांच्या बाबतीत सजग आणि समृद्ध असा देश संबोधला जात होता. इथल्या कौटुंबिक नातेसंबंधांची जगभरात उदाहरणे दिली जात होती. मात्र जसजसा देश आर्थिक प्रगती करत आहे. मोठमोठी शहरे आकार घेत आहेत. तसतसे भारतातील नातेसंबंध देखील बदलत आहेत. एकत्र कुटुंब पद्धती जाऊन आता जमाना झाला. आता चौकोनी कुटुंबात देखील एकाकीपणा आला आहे.

चांगल्या भविष्याच्या शोधात आता मुलं अन् नातवंडे दुसऱ्या शहरात, राज्यात, देशात जात आहेत. ते आपले म्हातारे आई वडील आणि आजी आजोबा मागे ठेवून जात आहेत. आता याच एकाकी पडलेल्या आजी आजोबांचे एकटेपण दूर करण्यासाठी भारतीय बाजारात एक नवीन बिजनेस मॉडेल वेगानं पसरत आहे. आता या आजी आजोबांना रेंटवर नात नातू मिळणार आहेत.

Rented Grandchild Startups
EPFO Startup Investments : पीएफचा निधी स्टार्टअपमध्ये गुंतवणार

अल जजीराने याबाबत एक सविस्त वृत्त दिलं आहे. भारतातील मेट्रो शहरांमध्ये असे अनेक स्टार्टअप्स सुरू झाले आहेत. ते पैशाच्या बदल्यात तरूण मुले मुली वृद्ध लोकांना वेळ देणे, त्यांची काळजी घेणे आणि भावनिक आधार देण्याची सेवा पुरवतात.

रेंटवर मिळणार नातू

गुरूग्रामचे एक उदाहरण देखील या रिपोर्टमध्ये देण्यात आलं आहे. त्यात ८० वर्षापेक्षा जास्त वय असलेल सुनील बुद्धीराजा यांच्या दोन्ही मुली अमेरिकेत राहतात. मात्र ज्यावेळी ते पत्नीसोबत बाजारासाठी जातात त्यावेळी त्यांच्या सोबत २६ वर्षाचे रॉनी राजू असतो. हा त्यांचा रेंटवर घेण्यात आलेला नातू आहे.

रॉनी हा काही डिलिव्हरी बॉय किंवा घरातील नोकर नाहीये. तो एक प्रोफेशनल सोशल वर्कर आहे. तो वृद्ध दांपत्याला रूग्णालयात घेऊन जाणे, त्यांच्या औषधाची काळजी घेणे, त्यांच्यासोबत पत्ते खेळणे. त्यांच्याशी गप्पा मारणे हे काम करतात. सुनील बुद्धीराजा सांगतात की, मी सुरूवातीपासूनच त्याच्यासोबत जुळवून घेतलं. तो मला १०० नाही २०० टक्के समजून घेतो.

Rented Grandchild Startups
Digital loneliness : नातं आहे, तरी मन एकटं का? सोशल मीडियामुळे वाढतोय का ‘डिजिटल लोनलीनेस’?

तासावर पैसे, रोलओव्हर सुविधा

असे स्टार्टअप्स या सेवांसाठी तासावर पैसे घेतात. उदाहरण द्यायचं झालं तर महिन्याचे १० तास सेवा घेतली तर प्रती तास ४५० रूपये. २५ तास सेवा घेतली तर प्रतीतास ४०० रूपये चार्ज असतात. विशेष बाब म्हणजे जसे मोबाईळमध्ये डेटा लोरओव्हर असतो तसं जर वृद्ध व्यक्तींचे एका महिन्यातील काही तास तसेच राहिले तर ते पुढच्या महिन्यात अॅड करून मिळतात. सध्याच्या घडीला ही सेवा उच्च मध्यम वर्गातील आणि आर्थिकरित्या सक्षम असलेल्या शहरी कुटुंबांपर्यंत मर्यादित आहे.

Rented Grandchild Startups
Loneliness memory loss risk | एकटेपणामुळे निर्माण होतात विस्मरणाच्या समस्या

३४ कोटी वृद्ध लोक एकटेपणाचे शिकार

संयुक्त राष्ट्र लोकसंध्या कोष आणि आयआयपीएसच्या इंडिया एजिंग रिपोर्ट २०२३ च्या आकडेवारीनुसार २०२२ पर्यंत भराताच्या एकूण लोकसंख्येत ६० पेक्षा जास्त वयाची लोकांची हिस्सेदारी १०.५ टक्के होती. २०५० पर्यंत ही टक्केवारी २१ टक्के होण्याची शक्यता आहे. म्हणजे जवळपास ३४.७ कोटी वृद्ध लोक असणार आहेत. राष्ट्रीय सर्वेक्षणानुसार एकटे राहणाऱ्या ६० वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या लोकांची संख्या ही एक तृतियांश आहे. म्हणजे जवळपास ३७ टक्के लोक हे वृद्ध गंभीर स्वरूपाचे किंवा मध्यम स्वरूपाचे एकटेपण भोगत आहेत.

हे एकटेपण दूर करण्यासाठीच भारतात एल्डर केअरचा बाजार आता ७ अब्ज डॉलर जवळपास ५८ हजार कोटी रूपयाच्या व्यवसायात रूपांतरित झाला आहे. एवढंच काय देशातील दिग्गज उद्योगपती दिवंगत रतन टाटा यांनी देखील २०२२ मध्ये या प्रकारच्या एका मुंबईमधील स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.