EPFO Startup Investments : पीएफचा निधी स्टार्टअपमध्ये गुंतवणार

ईपीएफओ करतेय मार्गदर्शक तत्त्वे, नोव्हेंबरमध्ये प्रस्ताव दाखल होणार
EPFO Startup Investments
EPFO Startup Investmentspudhari photo
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) आता ‘अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड्स’ (एआयएफएस) मध्ये गुंतवणूक करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करीत आहे. सरकारने पाच वर्षांपूर्वीच ईपीएफओ​​ला उच्च वाढक्षमता असलेली मालमत्ता आणि स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करण्याची परवानगी दिली होती.

गुरुवारी झालेल्या गुंतवणूक समितीच्या बैठकीत सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) एक प्रस्ताव चर्चेला घेतला होता. या प्रस्तावानुसार, ईपीएफओ​​च्या वार्षिक नवीन जमा रकमेपैकी ३ टक्क्यांपर्यंत रक्कम ‘कॅटेगरी १’ आणि ‘कॅटेगरी २’मध्ये निधी गुंतवला जाऊ शकतो.

EPFO Startup Investments
Global Commodity Prices Rise : विविध वस्तूंच्या किमती भडकणार!

या निर्णयामुळे ईपीएफओ ​​कामगारांच्या बचतीची गुंतवणूक करण्याच्या पद्धतीत मोठा बदल होणार आहे. पारंपरिक कर्ज साधनांच्या पलिकडे जाऊन स्टार्टअप्स आणि इतर विकासकेंद्रित गुंतवणुकींमध्ये ईपीएफओला संधी मिळू शकेल.

अहवालानुसार, हा प्रस्ताव नोव्हेंबर महिन्यात केंद्रीय विश्वस्त मंडळासमोर ठेवला जाईल. या मंडळाचे अध्यक्ष केंद्रीय कामगारमंत्री मनसुख मांडविया आहेत. ‘डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड’ने (डीपीआयआयटी) सप्टेंबर महिन्यात पाठवलेल्या एका पत्रानंतर समोर आली आहे. या पत्रात, नुकत्याच सुरू झालेल्या ‘स्टार्टअप इंडिया फंड ऑफ फंड्स २.०’मध्ये ईपीएफओ​​ने सहभागी व्हावे, अशी विनंती करण्यात आली होती.

या प्रस्तावामुळे एआयएफमधील गुंतवणुकीसाठी एक व्यापक आराखडा तयार करण्याबाबत चर्चा सुरू झाली, असेही अहवालात नमूद केले आहे. सुरुवातीच्या टप्प्यात, ईपीएफओ ​​’नॅशनल इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर फंड’ (एनआयआयएफ) आणि ‘स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया’चा (सीडबी) ‘स्टार्टअप इंडिया फंड ऑफ फंड्स २.०’ यांसारख्या संस्थांच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा विचार करीत आहे.

EPFO Startup Investments
Raigad Coconut Areca Nut Farming : रायगड जिल्ह्यातील नारळ-सुपारी बागांवर संकटाचे सावट

अर्थ मंत्रालयाने निश्चित केलेल्या गुंतवणूक धोरणानुसार, ईपीएफओ ​​आपल्या नवीन जमा रकमेपैकी ५ टक्क्यांपर्यंत रक्कम मालमत्ताआधारित आणि ट्रस्टसंरचित गुंतवणुकीत गुंतवू शकते. मात्र, आत्तापर्यंत त्यांनी सेबीद्वारे नियंत्रित ‘कॅटेगरी १’ आणि ‘कॅटेगरी २’मध्ये कोणतीही गुंतवणूक केलेली नाही.

असा आहे गुंतवणूक प्रस्ताव...

प्रस्तावित आराखड्यात काही सुरक्षा उपाययोजनांचाही समावेश आहे. यामध्ये पर्यायी गुंतवणूक निधी किमान १०० कोटी रुपये असणे आवश्यक आहे. एका विशिष्ट फंडामध्ये गुंतवणुकीची मर्यादा निश्चित करणे, परदेशी कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यावर निर्बंध घालणे आणि फंड व्यवस्थापकांचे स्वातंत्र्य सुनिश्चित करणे, यांसारख्या अटींचा यात समावेश आहे. अहवालानुसार, ईपीएफओ ​​सुमारे ३० कोटी सदस्यांच्या ३० लाख कोटी रुपयांच्या सेवानिवृत्ती बचतीचे व्यवस्थापन करते.

काय आहेत गुंतवणूक कॅटेगरी?

गुंतवणूक श्रेणीनुसार ‘कॅटेगरी १’ प्रामुख्याने स्टार्टअप्स, लघुव्यवसाय, पायाभूत सुविधा आणि व्हेंचर कॅपिटलला पाठबळ देतात; तर ‘कॅटेगरी २’ फंड्समध्ये प्रायव्हेट इक्विटी, रिअल इस्टेट आणि प्रायव्हेट डेट फंड्सचा (कर्जरोखे) समावेश होतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.