मोनिका क्षीरसागर
जोडीदार सोबत असूनही मनात एकटेपणाची भावना निर्माण होत असेल, तर त्यामागे भावनिक दुरावा असण्याची शक्यता आहे.
नात्यात संवाद कमी होणे, भावना व्यक्त न करणे किंवा एकमेकांना पुरेसा वेळ न देणे यामुळे मनाला एकटेपणा जाणवू शकतो.
सोशल मीडियावर इतरांची ‘परफेक्ट’ नाती पाहिल्याने नकळत आपल्या नात्याची तुलना सुरू होते.
सतत ऑनलाइन कनेक्टेड असूनही प्रत्यक्ष आयुष्यात मनमोकळा संवाद कमी झाल्यास ‘डिजिटल लोनलीनेस’ची भावना वाढू शकते.
रील्स, चॅटिंग आणि सोशल मीडिया स्क्रोलिंगमध्ये जास्त वेळ गेल्याने जोडीदारासोबतचा क्वालिटी टाइम कमी होऊ शकतो.
जोडीदाराने आपले म्हणणे ऐकून घ्यावे, भावना समजून घ्याव्यात आणि आपल्याला भावनिक आधार द्यावा, ही अपेक्षा पूर्ण न झाल्यास एकटेपणा अधिक तीव्र होतो.
हा एकटेपणा कमी करण्यासाठी सोशल मीडिया वापरावर मर्यादा ठेवून दररोज काही वेळ मोबाईलपासून दूर राहून संवाद साधणे फायदेशीर ठरू शकते.
नात्यात फक्त शारीरिक जवळीक नव्हे, तर भावनिक जोड, विश्वास आणि मनापासून केलेला संवादही आवश्यक असतो; यामुळे नात्यातील एकटेपणा कमी होण्यास मदत होऊ शकते.