

RBI Recruitment News: बँकेत नोकरी म्हणजे लाईफ सेट अशी धारणा आपल्याकडे आहे. बँकेत नोकरी लागली की लाईफ सेट झाली असं अनेक तरूणांना वाटतं. त्यामुळं बँकेत नोकरी मिळवण्यासाठी लाखो मुलं धडपडत असतात. अशाच धडपडणाऱ्या मुलांसाठी आरबीआयने एक नामी संधी दिली आहे.
भारतीय रिजर्व बँकेने यंग प्रोफेशनल्ससाठी पदांची भर्ती करत असल्याचे नोटिफिकेशन काढले आहे. या पदावर नियुक्त झाल्यानंतर उमेदवाराला महिन्याला १.५ लाख रूपये स्टायपेंड मिळणार आहे. मात्र या पदासाठी अर्ज करण्यापूर्वी याचे सर्व नियम आणि अटी जाणून घ्या.
माहितीसाठी आरबीआयमध्ये यंग प्रोफेशनल्ससाठी होणारी ही भर्ती कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर म्हणजे कंत्राटी पद्धतीने होणार आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही ६ जुलै असून इच्छुक उमेदवारांनी आरबीआयच्या अधिकृत भर्ती पोर्टलच्या माध्यामातून ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
यंद प्रोशेशनल्स कार्यक्रम हा आरबीआयच्या कामात मदत करण्यासाठी सुरू करण्यात आला आहे. यात निवड झालेले लोक अर्थव्यवस्थेचे विश्लेषण, धोरण तयार करण्यात मदत, संशोधन, डेटा जाणून गेणे आणि बँकिंग, डिजीटल फायनान्ससंदर्भातील काम करण्याची संधी मिळते.
यंग प्रोफेशनल्सच्या कामांमध्ये आर्थिक आणि धोरणात्मक रिसर्चमध्ये मदत करणे, डेटाचे विश्लेषण करणे आणि आर्थिक अभ्यास करून त्याचा रिपोर्ट तयार करणं, अंतर्गत प्रोजेक्टमध्ये योगदान देणं यांचा समावेश असतो. याशिवाय आर्थिक क्षेत्रात होणाऱ्या बदलांबाबत काम करणे आणि आरबीआयच्या टीमला तांत्रिक आणि विश्लेषण संबंधी कामात मदत करणे ही देखील जबाबदारी असते.
पगाराबाबत बोलायचं झालं तर निवड झालेल्या उमेदवारांना प्रत्येक महिन्याला १.५ लाख रूपये स्टायपेंड दिला जाणार आहे. आरबीआय सुरूवातीला तीन वर्षासाठी यंग प्रोफेशनल्सना नियुक्त करण्याची योजना आखत आहे. मात्र परस्पर सहमती आणि कामगिरीच्या जोरावर हा करार वाढवला देखील जाऊ शकतो. मात्र या पदावर तुम्ही जास्तीजास्त ५ वर्षे काम करू शकता.
यासाठी उमेदवारांना सर्वात आधी आरबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल.
तिथं यंग प्रोफेशनल्स प्रोग्राम २०२६ शी संबंधित लिंकवर क्लिक करावं लागेल.
त्यांनतर ऑनलाईन फॉर्म ओपन होईल.
तिथं वैयक्तिक आणि शैक्षणिक, व्यावसायिक माहिती भरावी लागेल.
गरजेची सर्व कागदपत्रे अपलोड करून प्रक्रिया पूर्ण करावी लागले.