Who Is Prateek Yadav: इंग्लंडमध्ये शिकलेला.. फिटनेस वेडा मात्र राजकारणापासून दूर... मुलायम सिंहांच्या मुलगा प्रतीक करायचा काय?

Who Is Prateek Yadav
Who Is Prateek Yadavpudhari
Published on
Updated on

Who Is Prateek Yadav: समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांचा छोटा मुलगा प्रतीक यादव याचे वयाच्या ३८ व्या वर्षी लखनौमध्ये दुर्दैवी निधन झालं. प्रतीक हा मुलायम सिंह यादव यांच्या दुसऱ्या पत्नी साधना गुप्ता यांचा मुलगा होता. त्याचा मृत्यू कशामुळं झाला हे अजून कळालेलं नाही. शवविच्छेदनाचा अहवाल अजून आलेला नाही. त्यानंतर त्याच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येईल.

प्रतीकला अनेक दिवसांपासून फुफ्फुसाचा आजार होता. त्याच्या फुफ्फुसामध्ये रक्ताची गुठळी झाली होती. त्याच्यावर उपचार सुरू होते.

Who Is Prateek Yadav
Yash struggle story | दिवसाला ५०० रुपये कमावणारा यश आज करोडोंचा सुपरस्टार; सांगितला संघर्षाचा थरारक प्रवास

प्रतीक होता उच्च शिक्षित

प्रतीक जरी फिटनेस फ्रिक असला तरी त्याचे शैक्षणिक पार्श्वभूमी देखील दमदार होती. त्याने इंग्लंडमधील लीड्स विद्यापीठातून एमबीएची डिग्री घेतली होती.

Who Is Prateek Yadav
Patralekha Body Shaming |बॉडी शेमिंगवरून टीका करणाऱ्या पापराझींना पत्रलेखाने सुनावले, म्हणाली...''मी दिवसभर बसून फक्त..''

फिटनेस वेडा

प्रतीक हा फिटनेस वेडा होता. तो आपले जीममधील फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत होता. त्याने २०१२ मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील बॉडी बिल्डिंग वेबसाईटवर इंटरनॅशनल ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द मंथ म्हणून फिचर झाला होता. त्याने या ट्रान्सफॉर्मेशनचे श्रेय त्याने मुलायम सिंह यादव यांना दिलं होतं.

Who Is Prateek Yadav
Patralekha Body Shaming |बॉडी शेमिंगवरून टीका करणाऱ्या पापराझींना पत्रलेखाने सुनावले, म्हणाली...''मी दिवसभर बसून फक्त..''

व्यवसाय

प्रतीक हा देशातील सर्वात शक्तीशाली राजकीय कुटुंबातील सदस्य असूनही तो राजकारणापासून अलिप्त राहिला होता. मात्र तो रिअल इस्टेट आणि फिटनेस व्यवसायात होता. लखनौमध्ये त्याची द फिटनेस प्लॅनेट नावाची जीम देखील होती. त्याचबरोबर तो होमलेस लोकांसाठीची एक एनजीओ देखील चालवत होता.

Who Is Prateek Yadav
Bads of Bollywood | दिवसाचा पगार २५ हजार; तरीही 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या 'या' अभिनेत्याने सोडली टीव्हीची नोकरी

वैवाहिक जीवन

प्रतीकने अपर्णा बिश्त (अपर्णा यादव) सोबत २०११ मध्ये लग्न केलं होतं. या लग्नाला देशातील वजनदार राजकीय व्यक्ती, उद्योगपती आणि मनोरंजन क्षेत्रातील व्यक्तींची उपस्थिती होती. प्रतीक आणि अपर्णा यांना दोन मुलं देखील झाली.

अपर्णा ही भारतीय जनता पक्षाची सक्रीय कार्यकर्ती आहे. तिने आपली राजकीय कारकीर्द समाजवादी पक्षातून सुरू केली मात्र २०२२ मध्ये ती भाजपमध्ये गेली.

Who Is Prateek Yadav
Sara Ali Khan | मदत करायला गेली आणि ट्रोल झाली; भिकारी म्हणाला, मी बिस्किट खात नाही, पहा Video

प्राणी मित्र प्रतीक

प्रतीक हा प्राण्यांच्या कल्याणासाठी सतत अग्रेसर होता. तो जीव आश्रय नावाची संस्था देखील चालवत होता. लखनौमधील ही एनजीओ प्राण्यांना उपचार, केअर, फूड आणि रेस्क्यू पुरवत होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news