PM Modi: 'भाई हमें अपना झालमुरी खिलाओ…' पंतप्रधानांनाही मोह आवरला नाही! मोदींनी चाखलेली बंगालची प्रसिद्ध 'झालमुरी' कशी बनवतात?

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रस्त्याकडेच्या दुकानात खाल्लेला झालमुरी हा पदार्थ नेमका काय आहे? आणि कसा बनवतात? जाणून घ्या सविस्तर.
PM Modi West Bengal Election 2026
PM Modi West Bengal Election 2026PM Narendra Modi X post
Published on
Updated on

PM Modi West Bengal Election 2026

झाडग्राम: पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यात रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी झाडग्राम येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या एका दुकानाजवळ अचानक आपला ताफा थांबवून कोलकात्याचे प्रसिद्ध स्ट्रीट फूड ‘झालमुरी’चा आनंद लुटला. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. झालमुरी हा पदार्थ नेमका काय आहे? आणि कसा बनवतात? जाणून घ्या सविस्तर.

पंतप्रधान मोदींचा ताफा झाडग्राममधील एका छोट्या दुकानाजवळ थांबला. स्वतः मोदी गाडीतून उतरून झालमुरीच्या स्टॉलकडे चालत जाताना पाहून तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी गर्दी केली. मोदींनी आपल्या 'एक्स' हँडलवरून या क्षणाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. "रविवारी पश्चिम बंगालमधील चार जाहीर सभांच्या व्यस्त वेळापत्रकादरम्यान, मी झाडग्राममध्ये काही चविष्ट आणि चटपटीत झालमुरीचा आस्वाद घेतला," असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

PM Modi West Bengal Election 2026
India-Russia Defense Pact | रशियाच्‍या ३,००० सैनिकांसह युद्धनौका भारतात तैनात होणार! जाणून घ्या संरक्षण करारातील खास गोष्टी

झालमुरीची चव इतकी खास का?

'झालमुरी' हे केवळ कोलकात्याचेच नव्हे, तर संपूर्ण पश्चिम बंगालचे आवडते स्ट्रीट फूड आहे. 'झाल' म्हणजे तिखट आणि 'मुडी' म्हणजे चुरमुरे. चिरमुरे, मसाले, कांदा, मिरची आणि मोहरीच्या तेलाचे मिश्रण करून तयार केला जाणारा हा पदार्थ आपल्या चटपटीत चवीसाठी ओळखला जातो. विशेषतः यामध्ये वापरले जाणारे कच्चे मोहरीचे तेल किंवा लोणच्याचे तेल या पदार्थाला एक वेगळाच सुगंध आणि चव देते.

हे स्ट्रीट फूड सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे असून ते अतिशय कमी वेळात तयार होते. आवडीनुसार यात खोबऱ्याचे तुकडे, जास्तीचा कांदा किंवा तिखटपणा कमी-जास्त करता येतो. बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनीही 'कौन बनेगा करोडपती'मध्ये आपल्या तरुणपणीच्या आठवणींना उजाळा देताना कोलकात्याच्या झालमुडीचा आवर्जून उल्लेख केला होता.

कशी बनवली जाते झालमुरी?

साहित्य:

चुरमुरे: २ कप (कुरकुरीत)

उकडलेले बटाटे: अर्धा कप (बारीक चिरलेले)

कांदा, टोमॅटो आणि काकडी: अर्धा कप (बारीक चिरलेली)

काळे चणे: २ मोठे चमचे (भिजवलेले किंवा उकडलेले)

हिरवी मिरची: चवीनुसार

१ मोठा चमचा लोणच्याचे मोहरीचे तेल

फरसाण/शेव: अर्धा कप

मसाले: काळे मीठ, भाजलेली जिरे पूड, चाट मसाला आणि लिंबाचा रस.

बनवण्याची पद्धत:

१. एका मोठ्या भांड्यात चिरलेले बटाटे, कांदा, टोमॅटो, काकडी, मिरची आणि चणे एकत्र करा.

२. त्यात काळे मीठ, जिरे पूड आणि चाट मसाला मिसळा.

३. आता यातील मुख्य घटक म्हणजेच लोणच्याचे मोहरीचे तेल घालून सर्व मिश्रण नीट एकत्र करा.

४. शेवटी चुरमुरे, चनाचूर आणि खोबऱ्याचे तुकडे टाकून ते वेगाने हलवा.

५. वरून लिंबू पिळा आणि चुरमुरे मऊ पडण्यापूर्वी लगेच सर्व्ह करा.

PM Modi West Bengal Election 2026
pm narendra modi address nation | महिला कधीच अपमान विसरत नाहीत, विरोधकांना त्यांच्या पापाची शिक्षा मिळणार : PM मोदींचा इशारा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news