PM Narendra Modi Live: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज काय बोलणार? संध्याकाळी 8.30 वाजता संबोधन

PM's adderss to the nation: लोकसभेत महिला आरक्षण विधेयक विरोधकांनी बहुमताने फेटाळल्याच्या पार्श्वभूमीवर मोदी काय बोलणार
Narendra Modi
Pm Narendra ModiPudhari

PM Narendra Modi's address to the nation Today 18 April

पंतप्रधान नरेंद्र आज (शनिवारी, 18 April 2026) रात्री देशाला संबोधित करणार आहेत. लोकसभेत महिला आरक्षण विधेयक विरोधकांनी बहुमताने फेटाळल्याच्या पार्श्वभूमीवर मोदी संबोधित करणार असल्याने ते नेमके काय बोलणार याकडे देशभराचे लक्ष लागले आहे.

शुक्रवारी सर्वच विरोधी पक्षांनी अभूतपूर्व एकजूट दाखवत महिला आरक्षण दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात मतदान केल्याने हे विधेयक लोकसभेत नामंजूर करण्यात आले. या विधेयकाच्या बाजूने २९८, तर विरोधात २३० मते पडली. केंद्र सरकारचे अत्यंत महत्त्वाकांक्षी विधेयक लोकसभेने फेटाळल्याने लोकसभेत मोदी सरकारचा दारुण पराभव झाला होता. हे विधेयक फेटाळल्यानंतर उर्वरित मतदारसंघ पुनर्रचना आणि केंद्रशासित प्रदेश कायदे (सुधारणा) विधेयक, २०२६ ही दोन्ही विधेयके सरकारला मागे घ्यावी लागल्याने नामुष्की ओढवली होती.

आज रात्री काय बोलणार? मोदींनी दिले संकेत

डीएमकेकडे तामिळनाडूच्या जनतेला दाखवायला विकासकामेच नाहीत. म्हणूनच त्यांनी राज्यातील जागा कमी होणार असल्याचा अपप्रचार केला. सर्वसामान्य कुटुंबातील महिलांच्या प्रगतीमध्ये विरोधी पक्ष अडथळे का आणत आहे, असा सवाल मोदींनी तामिळनाडूतील प्रचारसभेत विचारला आहे.

काँग्रेसने संविधान समजून घ्यावे -भाजप

काँग्रेसने संविधान समजून घेतले पाहिजे. मतदारसंघांची पुनर्रचना केल्याशिवाय संसदेतील किंवा राज्य विधानसभांमधील जागांच्या संख्येत फेरबदल करणे शक्य नाही, असे भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी सांगितले.

मोदींचे संबोधन म्हणजे एकपात्री प्रयोग -तृणमूल काँग्रेस

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे संबोधन म्हणजे एकपात्री प्रयोग असतात. त्यात कुठेही चर्चा नसते. गेल्या 15 वर्षात मोदींनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही. जनतेला आता मोदीजी काय बोलतात यात रस नाही, अशी टीका तृणमूल काँग्रेसने केली आहे.

आज मोदीजी देशातील महिलांशी संवाद साधणार- हेमा मालिनी

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्री साडे आठ वाजता देशातील महिलांशी संवाद साधणार आहे. देशभरातील महिला लोकसभेत विधेयक नामंजूर झाल्याने संतप्त झाल्या आहेत, अशी प्रतिक्रिया हेमा मालिनी यांनी दिली.

आज मोदींजींना ऐकाच - भाजप खासदार

आज काम बाजूला ठेवा आणि मोदीजींना ऐका. मोदींनी महिलांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. पण विरोधकांनी विधेयक नामंजूर केले. देशातील नारीशक्ती आता व्यक्त होतेय आणि उद्या ते आप-काँग्रेसला सडेतोड प्रत्युत्तर देणार, असे भाजप खासदार मनोज तिवारींनी सांगितले.

महिलांना आरक्षण मिळावं असं काँग्रेसला वाटत नाही- इराणी

मोदींच्या संबोधनाच्या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी एएनआय वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, आज पंतप्रधान देशाला संबोधित करतील. संसद आणि सरकारची कार्यपद्धत याबाबत ते भाष्य करण्याची शक्यता आहे. 2010 मध्ये काँग्रेसने हे महिला आरक्षणासंबंधीचे विधेयक आणले होते त्यावेळी विरोधी बाकावर असूनही भाजपने विधेयकाला पाठिंबा दिला होता. शुक्रवारी काँग्रेस- डीएमके- तृणमूल काँग्रेस या पक्षांनी चुकीची माहिती पसरवली. दक्षिणेतील राज्यांवर अन्याय होईल असं त्यांनी पसरवलं. काँग्रेसला महिलांना 33% आरक्षण द्यावे अशी काँग्रेसची इच्छा नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news