Petrol Price Hike In India: कच्चे तेल ८० डॉलरच्याही खाली, तरी पेट्रोलची दरवाढ मागे नाही; केंद्रीय मंत्र्यांनी थेटच सांगितलं

Petrol Diesel Price Hike
Petrol Diesel Price HikePudhari
Published on
Updated on

Petrol Prize Hike In India: इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धाचा ज्वर कमी आला आसून आता होर्मुझ देखील टप्प्याटप्प्यात खुलं करण्यात येत आहे. युद्धाच्या आणि नाकेबंदीच्या काळात कच्च्या तेलाच्या किंमती १२० डॉलर प्रती बॅरल पोहचल्या होत्या. त्यामुळं भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती देखील झपाट्याने वाढल्या होत्या.

मात्र आता कच्च्या तेलाच्या किंमती वेगाने खाली येत आहेत. ताज्या माहितीनुसार कच्च्या तेलाच्या किंमती प्रती बॅरल ८० डलरच्या खाली आल्या आहेत. मात्र असं असलं तरी भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी होताना दिसत नाहीयेत.

Petrol Diesel Price Hike
Petrol Price Hike : पेट्रोल-डिझेल पुन्हा महागणार? केंद्रीय मंत्र्यांच्या विधानाने कोट्यवधी जनतेची चिंता वाढली

केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी गुरूवारी सांगितलं की पश्चिम आशियात तणाव कमी झाल्यामुळं जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमती या ८० डॉलर प्रतीबॅरल आल्या आहेत. मात्र ग्राहकांना या कमी झालेल्या दरांचा त्वरित फायदा मिळणार नाहीये. याची अपेक्षा त्यांनी करू नये.

Petrol Diesel Price Hike
Petrol- Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे भाव पुन्हा वाढणार? सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार; दर वाढण्याचे कारण काय?

एवढ्यात सामान्यांना दिलासा नाही

पत्रकारांशी बोलताना गोपी यांनी सांगितलं की, आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती कमी होत आहे. मात्र तरी देखील पेट्रोल डिझेलचे वाढलेले दर त्वरित कमी करता येणा रनाही. कारण स्वस्त तेल खरेदी आणि त्याची वाहतूक करून ते भारतात यायला वेळ लागतो.

गोपी यांनी सांगितलं की स्वस्त कच्च तेल मार्केटमध्ये पोहचण्यासाठी अजून वेळ लागेल. कच्चे तेल होर्मुझ जलमार्गाद्वारे भारतात पोहचेल. त्यानंतर ते रिफाईन करायला वेळ लागणार आहे. ही परिस्थिती हळूहळू सामान्य होईल.

गोपी यांनी सांगितलं की इंधन दरवाढीचा फक्त ३.९४ रूपये प्रती लिटर थेट प्रभाव पडला आहे. मात्र कच्च्या तेलाच्या किंमतीत घट झाल्यावर त्वरित ही दरवाढ मागे घेतली जाऊ शकत नाही.

Petrol Diesel Price Hike
Petrol Diesel Price Hike: पेट्रोल २.६१ रुपयांनी, तर डिझेल २.७१ रुपयांनी महागले; दोन आठवड्यांत चौथ्यांदा वाढ
Petrol Diesel Price Hike
Petrol Excise Duty : केंद्र सरकारकडून इथेनॉल मिश्रित पेट्रोलवरील उत्पादन शुल्क रद्द; पेट्रोलची किंमत कमी होणार?

तेल कंपन्यांवर मोठा दबाव

गोपी यांनी सांगितलं की या वर्षाच्या सुरूवातीला पश्चिम आशियातील संघर्षावेळी भारतीय तेल कंपन्यांवर मोठा दबाव होता. केंद्राने या आर्थिक दबावाचे काही प्रमाणात भार आपल्या डोक्यावर उचलला होता. यासाठी केंद्र सरकारचे १२ हजार कोटी रूपयांचे नुकसान झाले होते. अनेक राज्यांनी वाढलेल्या इंधन किंमतीची झळ थेट ग्राहकांना बसू नये म्हणून त्यावरील विविध कर कमी केले होते. त्यामुळे त्याच्या महसुलात तूट झाली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news