AI for mental health | तरुणाई मानसिक आरोग्यासाठी 'AI' च्या आहारी? सर्वेक्षणातून आले धक्कादायक वास्तव समोर!

तरुण पिढी मानसिक समस्या सोडवण्यासाठी करते तंत्रज्ञानाचा वापर
AI for mental health
AI-generated imagepudhari
Published on
Updated on

AI for mental health

वॉशिंग्टन : जगभरात चिंता, ताणतणाव आणि नैराश्याचे प्रमाण वाढत असताना, एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका नवीन सर्वेक्षणानुसार, दर १० पैकी ६ पेक्षा जास्त लोक कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) द्वारे मानसिक आरोग्याविषयी सल्ला घेतात. विशेष म्हणजे, सल्ला घेणाऱ्यांपैकी ४५% लोक या सल्ल्यावर समाधानी नाहीत.

६८ टक्के लोकांना सौम्य पातळीवर मानसिक आरोग्याच्या समस्या

वार्षिक 'माइंड हेल्थ रिपोर्ट'च्या (Mind Health Report) ताज्या आवृत्तीनुसार, ६८% लोक सौम्य पातळीवर का होईना, पण चिंता, ताण किंवा नैराश्याने ग्रस्त असण्याची शक्यता आहे. १८ ते २४ वयोगटातील तरुणांमध्ये हे प्रमाण तब्बल ८५% इतके जास्त आहे.

AI for mental health
Digital Twin technology | ‘डिजिटल ट्विन’च्या जगात

१८ देशांमध्ये सर्वेक्षण

'युरोन्यूज'च्‍या रिपोर्टनुसार, जगभरात मानसिक आरोग्यासाठी लोक नेमके कोणते उपाय करतात याचा अभ्यास 'AXA' या आरोग्य विमा कंपनीने आणि 'IPSOS' या बहुराष्ट्रीय बाजार संशोधन संस्थेने संयुक्तपणे केला आहे. १२ जानेवारी ते १६ फेब्रुवारी २०२६ दरम्यान १८ देशांमधील १८ ते ७५ वयोगटातील १९,००० प्रौढांच्या मुलाखतींचे यामध्ये विश्लेषण करण्यात आले.

AI for mental health
Agentic AI Revolution | ‘एजेंटिक एआय’ची नवक्रांती

तरुण पिढीला सर्वाधिक फटका

सर्वेक्षणात असे आढळले की, ४६% लोक मानसिक संघर्षाचा सामना करत आहेत. यातील ६५% लोकांनी आपल्याला "उदास आणि निराश" वाटत असल्याचे सांगितले. वयोगटानुसार विचार केल्यास, १८ ते २४ वयोगटातील तरुणांना मानसिक समस्यांचा सर्वाधिक त्रास होत आहे. सुमारे ४३% तरुण गंभीर किंवा अत्यंत तीव्र पातळीवरील नैराश्य, चिंता किंवा तणावाने ग्रस्त आहेत, जे जागतिक सरासरीच्या (२६%) तुलनेत जवळपास दुप्पट आहे.

AI for mental health
सावधान! AI च्या रडारवर 'या' 10 नोकऱ्या; आता तुमचं करिअर पूर्वीसारखं राहणार नाही, Sam Altman यांचा इशारा

मानसिक समस्या सोडवण्यासाठी करते तंत्रज्ञानाचा वापर

या सर्वेक्षणात असे दिसून आले की, तरुण पिढी मानसिक आरोग्याविषयी उघडपणे बोलणे, मदत मागणे आणि आपल्या समस्या सोडवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे यामध्ये इतर वयोगटांपेक्षा वेगळी आहे.

AI for mental health
AI Ex-Partner Trend: 'एक्स' सोबत पुन्हा बोलण्यासाठी तरुणाई 'AI'चा वापर कशी करतेय? जाणून घ्या नवा ट्रेंड

तरुण पिढीमध्ये वाढतोय एकाकीपणा

AXA चे आरोग्य आणि प्रतिबंध विभागाचे प्रमुख खालेद एल शारानी यांच्या मते, या वयोगटातील बदलांवर लक्ष ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांनी 'युरोन्यूज हेल्थ'शी बोलताना सांगितले, "यावर अजून बरेच संशोधन होणे गरजेचे आहे. परंतु, स्क्रीनचा अतिवापर आणि तंत्रज्ञानावरील वाढते अवलंबित्व यामुळे या तरुण पिढीत एकाकीपणा वाढतो आहे, हे समजायला फार मोठ्या संशोधनाची गरज नाही."

AI for mental health
Human-Centric AI : ‘मानव‌’केंद्रित एआय!

मानसिक आरोग्य बिघडण्यास काय कारणीभूत?

या अभ्यासात मोबाईल स्क्रीन आणि तंत्रज्ञानाचा वापर हे मानसिक आरोग्य बिघडण्याचे मुख्य कारण असल्याचे समोर आले आहे. सर्वेक्षणानुसार, लोक काम, अभ्यास आणि वीकेंडचे उपक्रम वगाळता दररोज सरासरी ५.१ तास स्क्रीनवर (मोबाईल/लॅपटॉप) व्यतीत करत असल्याचे निदर्शनास आले. हा स्क्रीन टाईम वेगवेगळ्या देशांमध्ये भिन्न आहे. थायलंड आणि फिलिपिन्समध्ये हे प्रमाण दररोज ६.४ तास आहे, तर जपानमध्ये ४.२ तास आणि स्वित्झर्लंडमध्ये ४.१ तास आहे.

AI for mental health
AI Chatbot Tragedy | धक्‍कादायक..! 'एआय' चॅटबॉटला मानले पत्नी; भावनिक गुंतागुंतीतून तरुणाने जीवन संपवले!

मोबाईल फोनच्या अतिवापरामुळे मानसिक आरोग्यावर परिणाम

सुमारे ६६% लोकांनी सांगितले की, स्क्रीनच्या वापरामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनावर, विशेषतः झोप, एकाग्रता आणि शारीरिक हालचालींवर मध्यम ते गंभीर स्वरूपाचा परिणाम झाला आहे. तर ३९% लोकांसाठी हा परिणाम "अत्यंत तीव्र" होता. IPSOS पब्लिक अफेअर्सच्या अकाउंट डायरेक्टर सोफी मोरिन यांनी या सर्वेक्षणाबाबत म्हटलं आहे की, "लोक मान्य करत आहेत की त्यांच्या स्क्रीनच्या वापरामुळे त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टींवर परिणाम होत आहे. तसेच, एक तृतीयांशपेक्षा जास्त लोकांच्या मते यामुळे त्यांचा सामाजिक एकाकीपणा वाढतो आहे."

समस्येचे कारण की उपायाचा भाग?

या अभ्यासात लोकांना मानसिक आरोग्यासाठी उपचार घेण्यापासून रोखणारे अनेक अडथळे समोर आले, ज्यामध्ये प्रामुख्याने खर्च आणि वेळेची कमतरता यांचा समावेश आहे. चिंतेची बाब म्हणजे, मानसिक समस्येचा सामना करणाऱ्या लोकांपैकी ४३% लोकांनी गेल्या १२ महिन्यांत कोणत्याही तज्ज्ञांची मदत घेतलेली नाही. कारण त्यांच्यापैकी २५% पेक्षा जास्त लोकांना असे वाटते की यासाठी वैद्यकीय उपचारांची कोणतीही गरज नाही, असेही मोरिन यांनी म्हटले आहे.

AI for mental health
धक्कादायक! एका महिलेने औषध समजून गिळला एअरपॉड, त्यानंतर तिच्या पोटातून येऊ लागले व्हॉइस मेसेज

'AI' शी संवाद वाढला

सर्वेक्षणात असे निदर्शनास आले की, मानसिक आरोग्याबाबत वैद्यकीय उपचारांऐवजी, लोक स्वतःहून उपाय करण्यावर भर देत आहेत. यामध्ये शारीरिक व्यायाम, कुटुंब आणि मित्रांशी संवाद साधणे आणि 'AI' चा वापर करणे यामध्ये वाढ झाली आहे. सुमारे ६३% लोकांनी मानसिक आरोग्याशी संबंधित प्रश्नांसाठी ChatGPT आणि इतर AI बॉट्सचा वापर केल्याचे मान्य केले. ३८% लोकांनी मानसिक आरोग्य तज्ज्ञांपेक्षा AI प्लॅटफॉर्मवर जास्त विश्वास असल्याचे सांगितले, जरी बहुतांश युजर्स चॅटबॉट्सच्या उत्तरांवर समाधानी नव्हते.

तज्ज्ञ काय म्हणतात?

तज्ज्ञांच्या मते, "मानसिक आरोग्यासाठी AI ही खूप वाईट गोष्ट आहे, असे म्हणून चालणार नाही. कारण AI २४ तास उपलब्ध असते, ते मोफत आहे आणि रात्री ११ किंवा १ वाजता जेव्हा तुम्ही खोलीत एकटे असता आणि तुम्हाला बरे वाटत नसते, तेव्हा ते तुमच्या फोनवर उपलब्ध असते." त्या कठीण क्षणांमध्ये कोणाशी तरी संवाद साधता येणे अत्यंत महत्त्वाचे असते. तुम्ही जर ChatGPT किंवा Gemini वापरत असाल, तर हे सामान्य एआय मॉडेल्स आहेत, ते मानसिक उपचारांसाठी बनवलेले नाहीत. हे एखाद्या अशा मित्राशी बोलण्यासारखे आहे ज्याला याबद्दल थोडीफार माहिती आहे, पण तो डॉक्टर नाही. AI प्लॅटफॉर्म्समध्ये अशा काही मर्यादा असणे आवश्यक आहे, ज्याद्वारे ते धोक्याची लक्षणे ओळखू शकतील आणि संबंधित युजरला योग्य वैद्यकीय तज्ज्ञांकडे किंवा हेल्पलाईनकडे त्वरित पाठवू शकतील, अशीही मागणी या सर्वेक्षणातून समोर आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news