AI Ex-Partner Trend: 'एक्स' सोबत पुन्हा बोलण्यासाठी तरुणाई 'AI'चा वापर कशी करतेय? जाणून घ्या नवा ट्रेंड

प्रेमात मिळालेला नकार किंवा जोडीदाराशी झालेला ब्रेकअप पचवणे अनेकांसाठी कठीण असते. मात्र, तरुणाईने यावर एक उपाय शोधला आहे.
AI Ex-Partner Trend
AI Ex-Partner Trendfile photo
Published on
Updated on

AI Ex-Partner Trend

शांघाय: प्रेमात मिळालेला नकार किंवा जोडीदाराशी झालेला ब्रेकअप पचवणे अनेकांसाठी कठीण असते. मात्र, चीनमधील तरुणाईने यावर एक उपाय शोधला आहे. 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स'च्या मदतीने तरुण आता आपल्या आधीच्या प्रियकर किंवा प्रेयसीची हुबेहूब डिजिटल प्रतिकृती तयार करत आहेत.

या 'एआय एक्स'सोबत वापरकर्त्यांना भूतकाळात ज्या भावना व्यक्त करता आल्या नव्हत्या त्या सर्व व्यक्त करता येतात. मात्र, या तंत्रज्ञानामुळे मानसिक आरोग्यावर आणि गोपनीयतेवर होणाऱ्या परिणामांबाबत तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.

AI Ex-Partner Trend
Relationship Tips: सुखी नात्याचे खरे कारण काय असते? जोडीदारात शोधा फक्त 'हा' एक गुण!

'एक्स'सोबत पुन्हा बोलण्यासाठी 'AI'चा आधार

या तंत्रज्ञानामध्ये वापरकर्ते आपल्या आधीच्या जोडीदाराचे जुने चॅट्स, सोशल मीडिया पोस्ट, फोटो आणि व्हॉईस नोट्स 'एआय' टूलमध्ये अपलोड करतात. इतकेच नव्हे, तर त्यांच्या संभाषणाची पद्धत, आवडीचे शब्द, खास सवयी आणि अगदी जुन्या भांडणांचे संदर्भही यामध्ये फीड केले जातात. या माहितीच्या आधारे 'एआय' संबंधित व्यक्तीची डिजिटल आवृत्ती तयार करते, जी हुबेहूब मूळ व्यक्तीसारखी संवाद साधू शकते.

हे तंत्रज्ञान मूळचे Colleague.skill या ओपन सोर्स प्रोजेक्टवर आधारित आहे. शांघायमधील झोऊ तियानयी याने कार्यालयातील संवाद सुलभ करण्यासाठी हे टूल बनवले होते. मात्र, हळूहळू त्याचा वापर वैयक्तिक आयुष्यातील रिकामपण भरून काढण्यासाठी होऊ लागला. काही वापरकर्त्यांनी तर चक्क एलॉन मस्क आणि स्टीव्ह जॉब्स यांसारख्या दिग्गज व्यक्तींचेही डिजिटल अवतार तयार केले आहेत.

तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा

या ट्रेंडबाबत समाज आणि तंत्रज्ञान क्षेत्रात दोन गट पडले आहेत. अनेकांच्या मते, यामुळे मनात दाबून ठेवलेल्या भावना व्यक्त करण्याची संधी मिळते. तर मानसशास्त्रज्ञांच्या मते, यामुळे तरुणांची भावनिक परावलंबित्व वाढू शकते. काहींच्या मते, जुन्या जोडीदाराची आठवण येणे स्वाभाविक आहे, परंतु अशा साधनांचा अतिवापर वास्तविक नात्यांना हानी पोहोचवू शकतो. गोपनीयता हा यातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. संमतीशिवाय आधीच्या जोडीदाराचा डेटा वापरणे हे कायद्याचे उल्लंघन ठरू शकते.

AI Ex-Partner Trend
Relationship: ऑनलाईन नाती जुळतात, पण प्रेम टिकतं का? ६ हजार लोकांवरील संशोधनातून समोर आलं धक्कादायक सत्य!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news