

Operation Sindoor : पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तानमध्ये घुसून 'ऑपरेशन सिंदूर' राबवले. या कारवाईला सर्वच राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनीया मुद्द्यावर सरकारला पाठिंबा दिला; परंतु, आता राहुल गांधी लष्करी कारवाईवर प्रश्न उपस्थित करत आहेत. मात्र त्यांच्या पक्षातही यावर एकमत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. एकेकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कट्टर विरोधी नेते म्हणून ओळखले काँग्रेस नेतेही राहल गांधी यांच्या भूमिकेचे समर्थन करताना दिसत नसून, या निमित्त पक्षातील दुफळी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानसोबत युद्धबंदीमध्ये मध्यस्थी केली, असा दावा करत राहुल गांधी आणि पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केंद्र सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे ट्रम्प यांनीही आपण दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. आता पक्षाचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनीही ऑपरेशन सिंदूरबाबत काँग्रेस नेतेही चुकीची माहिती देत असल्याचे म्हटले आहे.
पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद आणि ऑपरेशन सिंदूर या विषयावर जगभरातील देशांना भेट देणासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय शिष्टमंडळाची घाेषणा केली आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी स्पष्ट केले की, 'भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या चर्चेत अन्य कोणीही हस्तक्षेप केला नाही. कोणीही मध्यस्थी करून शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला नाही. शशी थरुर यांनीही 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन केले. केंद्र सरकारने सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरुर यांच्या नावाचा समावेश केला. आपल्याला विचारणा झाली नसल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले आहे.
माजी परराष्ट्र राज्यमंत्री सलमान खुर्शीद हे गांधी कुटुंबीयांचे निकटवर्ती मानले जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारच्या धोरणांचे ते कट्टर टीकाकार म्हणूनही त्यांची ओळख आहे.पंतप्रधान मोदींनी बलुचिस्तानमधील पाकिस्तानी अत्याचारांचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर खुर्शीद यांनी त्यांच्यावर जोरदार टीकाही केली केली होती. मात्र आता खुर्शीद हे ऑपरेशन सिंदूरच्या मुद्द्यावर परदेशात जाऊन भारताची बाजू मांडण्याच्या मोदी सरकारच्या उपक्रमाला पाठिंबा दिला आहे. त्यांनी स्वतःहून शिष्टमंडळात सहभागी होण्यास सहमती दर्शविली आहे. त्यांनी या मुद्द्यावर राहुल आणि खर्गे यांच्या मताशी असहमती दर्शवली आहे.
मोदी सरकारच्या वतीने सर्वपक्षीय शिष्टमंडळात समाविष्ट असलेले काँग्रेस खासदार मनीष तिवारी हे देखील पंतप्रधान मोदींच्या धोरणांच्या कट्टर विरोधकांमध्ये गणले जातात. त्यांनीऑपरेशन सिंदूरच्या मुद्द्यावर प्रत्येक देशभक्ताला समान पद्धतीने वागण्याचा संदेशही देत आहेत. शशी थरूर हे ऑपरेशन सिंदूरवरुन राजकारण करता कामा नये, असे म्हणणारे काँग्रेसचे प्रमुख नेते आहेत. त्यांनी ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर भारत सरकारच्या राजनैतिक कारभाराचे जोरदार समर्थन केले आहे.
राहुल गांधींच्या राजकारणाचा काँग्रेसवर इतका परिणाम झाला आहे की, आता पक्षाने सर्वपक्षीय शिष्टमंडळ परदेशात पाठवण्याच्या उद्देशावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. पक्षाचे सरचिटणीस आणि संपर्क प्रभारी जयराम रमेश यांनी माध्यमांशी बोलताना असेही म्हटले की 'लक्ष वळवण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ परदेशात पाठवले जात आहे.' काँग्रेसमधील कट्टर मोदीविरोधी लोकांनीही देशाच्या मुद्द्यावर पक्षासाठी राजकारणाची एक लांबलचक 'लक्ष्मण रेखा' काढली आहे.