India Pakistan tensions | निर्लज्ज पाकिस्तानची कबुली! म्हणतो, पुलवामा हल्ला रणनीतिक यश, तर पहलगाम हल्ला...

पहलगाम हल्ल्यानंतर युद्धाची ठिणगी पडली असतानाच पाकिस्तानने पुलवामा हल्ल्याबाबत निर्लज्ज कबुली दिली आहे.
India Pakistan tensions
India Pakistan tensionsfile photo
Published on
Updated on

दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर युद्धाची ठिणगी पडली असतानाच पाकिस्तानच्या लष्कराने २०१९ मध्ये पुलवामा दहशतवादी हल्ला केल्याची निर्लज्ज कबुली दिली आहे. पाकिस्तानच्या हवाई दलाचे जनसंपर्क प्रमुख एअर व्हाइस मार्शल औरंगजेब अहमद यांनी पुलवामा दहशतवादी हल्ला हा लष्कराचे "रणनीतीक कौशल्य" होतं आणि आता आम्ही आमच्या धोरणात्मक चातुर्याचा प्रत्यय दिला, असं सांगत पहलगाम हल्यातील सहभागाची कबुली दिली आहे.

'पुलवामा आमचं रणनीतिक कौशल्य होतं'; पाकिस्तानचा खुलासा

शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत औरंगजेब अहमद म्हणाले, "पुलवामामध्ये आमचं रणनीतिक चातुर्य दाखवलं. आता आम्ही आमच्या धोरणात्मक प्रगतीचा दाखला दिला आहे." यावेळी पाकिस्तानचे लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी आणि नौदल प्रवक्तेही उपस्थित होते. पाकिस्तानने याआधी या हल्ल्यातील सहभाग नाकारला होता. त्यांच्या या विधानाने पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड झाला आहे. इतकेच नव्हे, तर २२ एप्रिल रोजी पाहलगाव येथे झालेल्या हल्ल्याबाबत पाकिस्तानच्या निष्पापतेचा दावा खोटा ठरला आहे.

"जर पाकिस्तानच्या हवाई क्षेत्राला, जमिनीला, पाण्याला किंवा त्यांच्या लोकांना धोका असेल तर कोणतीही तडजोड करता येणार नाही. आपण आपल्या राष्ट्राचे ऋणी आहोत. पाकिस्तानी लोकांना त्यांच्या सशस्त्र दलांवर असलेला अभिमान आणि विश्वास आम्ही कोणत्याही परिस्थीतीत नेहमीच जपतो. पुलवामामध्ये आमच्या रणनीतिक कौशल्याद्वारे आम्ही हेच सांगण्याचा प्रयत्न केला. आता आम्ही आमच्या कार्यात्मक प्रगतीचा आणि धोरणात्मक चातुर्याचा प्रत्यय दिला आहे," असे औरंगजेब अहमद यांनी सांगितले.

India Pakistan tensions
India-Pakistan Tensions | काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी करणार! ट्रम्प यांची मोठी घोषणा

खोटारड्या पाकिस्तानचा खरा चेहरा पुन्हा समोर! 

पुलवामामध्ये २०१९ मध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या हल्ल्यात ४० सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. भारताने यानंतर बालाकोटमधील जैशच्या प्रशिक्षण तळावर हल्ला केला होता. पाकिस्तानने भारतीय पायलट अभिनंदन वर्धमानला ताब्यात घेतले होते. मात्र दोन्ही देशांमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने वर्धमान यांना सोडले होते. त्यावेळी पाक पंतप्रधान इमरान खान यांनी या हल्ल्यातील पाकिस्तानचा सहभाग फेटाळला होता. आता औरंगजेब अहमद यांनी केलेल्या वक्तव्याने पाकिस्तानचा खरा चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे.

संयुक्त राष्ट्राच्या यादीतील दहशतवाद्याचा मुलगा DG ISPR!

याच पत्रकार परिषदेत सहभागी असलेले ISPR चे महासंचालक लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी हे अणुशास्त्रज्ञ सुलतान बशीरुद्दीन महमूद यांचे पुत्र आहेत. ज्यांनी अल-कायदा प्रमुख ओसामा बिन लादेनला भेटून दहशतवाद्यांना अण्वस्त्र तंत्रज्ञान देण्याचा प्रयत्न केला होता. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अल-कायदा निर्बंध समितीच्या दहशतवाद्यांच्या यादीत त्यांचा समावेश आहे.

इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) ही पाकिस्तान सशस्त्र दलांची मीडिया आणि जनसंपर्क शाखा आहे. ती देशातील माध्यमे आणि समाजाला लष्करी बातम्या आणि माहिती प्रसारित आणि समन्वयित करते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news