Accident viral video: नशीब म्हणजे काय, हे हा व्हिडिओ पाहिल्यावर समजेल! दुचाकीस्वाराला वाचवताना बस पेट्रोल पंपात घुसली

दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने लग्नसमारंभासाठी जाणारी वऱ्हाडाची बस उलटली. दुचाकीवर बसलेला एक व्यक्ती या अपघातातून थोडक्यात बचावल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
Accident viral video
Accident viral video File Photo
Published on
Updated on

Kerala bus Accident viral video

कोठट्टुकुलम : दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने लग्नसमारंभासाठी जाणारी वऱ्हाडाची बस उलटली. केरळमधील कोठट्टुकुलम-पिरवोम मार्गावरील कक्कूर येथे गुरुवारी सकाळी हा अपघात झाला. बसमध्ये सुमारे ३५ जण होते. यामध्ये सुमारे २० प्रवासी जखमी झाले असून, सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे १०.२५ वाजता बस पिरवोमहून एलांजीच्या दिशेने जात होती. त्यावेळी अचानक एका दुचाकीस्वाराने कोणताही सिग्नल न देता वळण घेतले. त्याला धडक टाळण्यासाठी बसचालकाने अचानक बस उजवीकडे वळवली. चालकाने ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला; मात्र बसवरील नियंत्रण सुटले आणि ती पेट्रोल पंपाजवळ उलटली.

अपघाताचा व्हिडिओ पाहा

बस इंधन भरण्याच्या मशीनला, पेट्रोल भरण्यासाठी थांबलेल्या एका कारला आणि अन्य एका दुचाकीला थोडक्यात धडकण्यापासून बचावली. तसेच पेट्रोल भरल्यानंतर दुचाकीवर बसलेला एक व्यक्तीही या अपघातातून थोडक्यात बचावल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

बसने इंधन भरण्याच्या यंत्रांना धडक दिली असती, तर मोठी आग लागण्याची शक्यता होती. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी उलटलेल्या बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. त्यानंतर जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Accident viral video
Viral Gen Z Student Video: डान्स केला म्हणून भाजपची टीका; विद्यार्थिनीने दिलं भन्नाट उत्तर, राहुल गांधींनीही शेअर केला व्हिडिओ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news