Crime News: पोटच्या दोन लेकींनीच केला बापाचा खून; एकीने पाय धरले, दुसरीने गळा चिरला; कारण ऐकून हादराल!

Daughters Murder Father Uttar Pradesh Crime: दोन सख्ख्या बहिणींनी आपल्या ६० वर्षीय पित्याची निर्घृण हत्या केली. मुजफ्फरनगर जिल्ह्यात ही माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे.
Daughters Murder Father Uttar Pradesh Crime
Daughters Murder Father Uttar Pradesh CrimeAI Photo
Published on
Updated on

Daughters Murder Father Uttar Pradesh Crime news

मुजफ्फरनगर: घरात सतत होणारा मुलगा-मुलगी भेदभाव आणि वडिलांच्या शिव्या तसेच टोमण्यांना कंटाळून दोन सख्ख्या बहिणींनी आपल्या ६० वर्षीय पित्याची निर्घृण हत्या केली. उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर जिल्ह्यात ही माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. १६ आणि ३२ वर्षांच्या या दोन बहिणींनी झोपेत असलेल्या वडिलांचा गळा चिरून त्यांचा काटा काढला.

Daughters Murder Father Uttar Pradesh Crime
HSC Exam: आई कुठं शोधू तुला..., घरात आईचं पार्थिव, तरीही लेकीनं दिला बारावीचा पेपर

दोन बहिणींनी असा रचला हत्येचा कट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही मुली गेल्या काही दिवसांपासून आपल्या शेतकरी वडिलांच्या हत्येचा कट रचत होत्या. रविवारी रात्री त्यांनी आपल्या आईसह कुटुंबातील इतर सदस्यांच्या जेवणात गुंगीचे औषध मिसळले. सर्वजण गाढ झोपेत असताना, वडिलांच्या खोलीत जाऊन धाकट्या मुलीने त्यांचे पाय घट्ट धरले, तर मोठ्या बहिणीने स्वयंपाकघरातील सुरीने त्यांचा गळा चिरला.

दोन तासांत गुन्ह्याचा उलगडा

सोमवारी पहाटे रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पाहून परिसरात खळबळ माजली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी अवघ्या दोन तासांत दोन्ही मुलींना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

Daughters Murder Father Uttar Pradesh Crime
Chandrapur crime news: बाप रे! संपत्तीसाठी सख्या बहिणीचा गळा चिरला, आईवरही वार; चंद्रपूर हादरलं!

वडिलांचा खून का केला?

ग्रामीण पोलीस अधीक्षक आदित्य बन्सल यांनी सांगितले की, चौकशीदरम्यान मुलींनी आपल्या वडिलांच्या वागणुकीवर तीव्र संताप व्यक्त केला. "वडील नेहमी मुलगा आणि मुलींमध्ये भेदभाव करायचे. लग्न न झाल्यामुळे आणि घरीच राहत असल्यामुळे ते सतत आम्हाला टोमणे मारायचे आणि अपमानित करायचे. या जाचाला कंटाळूनच आम्ही हे पाऊल उचलले," असे मुलींनी कबुलीत म्हटले आहे.

पोलिसांना घटनास्थळावरून काय मिळालं?

पोलिसांनी घटनास्थळावरून गुंगीच्या गोळ्यांची पाकिटे आणि हत्येसाठी वापरलेली सुरी जप्त केली आहे. मोठ्या मुलीचे रक्ताने माखलेले कपडे चाऱ्याच्या ढिगाऱ्यात लपवून ठेवले होते, ते देखील पोलिसांनी हस्तगत केले आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, न्यायालयाने दोन्ही आरोपी बहिणींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Daughters Murder Father Uttar Pradesh Crime
Bihar Bride Shot: धक्कादायक! एकतर्फी प्रेमातून लग्नमंडपातच नवरीवर गोळीबार; घटना कॅमेऱ्यात कैद

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news